'भाजपला ब्लॅकमेल करण्यासाठी सदाभाऊ खोत यांच्याकडून स्वाभिमानीचा वापर' 

raju shetty criticism on sadabhau khot
raju shetty criticism on sadabhau khot
Updated on

कोल्हापूर : सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यावे म्हणून कोणीही विचारायला गेलेले नाहीत. पण, भाजपला "ब्लॅकमेल' करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते बुजगावन करत आहेत. कोणालाही स्वार्थासाठी स्वाभिमानीचा वापर करु देणार नाही, असा पलटवार माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना केला. 

सदाभाऊ खोत स्वाभिमानीच्या वाटेवर अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री शेट्टी यांच्याशी संवाद साधला. 

श्री शेट्टी म्हणाले, खोतांकडून स्वाभिमानीचा वापर करुन घेतला जात आहे. केवळ आणि केवळ भाजपला भिती दाखण्यासाठी ही खेळी सुरु आहे. आम्ही त्यांना स्वाभिमानीचा वापर करु देणार नाही. ज्यांना आम्ही स्वाभिमानीत येणार का? म्हणून विचारत पण नाही. तेच आता स्वाभिमानीचा वापर करुन भाजपवर दबाव टाकत आहेत. परवा-परवापर्यंत केंद्र सरकारने शेती उत्पादनाला हमी भाव द्यावा अशी मागणी करत होते. वेळ प्रसंगी राजू शेट्टींना खांद्यावर घेवू असेही ते म्हणत होते. पण आता ती वेळ राहिली नाही. केवळ आणि केवळ भाजपला ब्लॅकमेल करण्यासाठीचाच हा फंडा आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाचेही बुजगावने होणार नाही आणि होवूही देणार नाही, असा पलटवार श्री शेट्टी यांनी केला. खोतांनी स्वाभिमानी यावे आणि आम्ही स्वीकारावे असा कोणताच प्रश्‍न नाही, असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.