खासदार कोल्हापुरचा होणार हे ठरलंय पण कोण मारणार बाजी?

सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे पवार तर भाजपकडून महाडिक रिंगणात आहेत
Rajyasabha Election 2022 Live kolhapur
Rajyasabha Election 2022 Live kolhapur
Updated on
Summary

सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे पवार तर भाजपकडून महाडिक रिंगणात आहेत.

कोल्हापूर - राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान आणि लगेच मतमोजणी होत आहे. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी कोल्हापूरला तिसरा खासदार मिळणार आहे. यात शिवसेनेचे संजय पवार बाजी मारणार की भाजपचे धनंजय महाडिक याची कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Rajyasabha Election 2022 Live kolhapur)

राज्यातून निवडून द्यायच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. रिंगणात सात उमेदवार आहेत. पक्षनिहाय आमदारांची संख्या पाहता भाजपचे दोन व शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार सहज विजय होतील. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे पवार तर भाजपकडून महाडिक रिंगणात आहेत. महाडिक यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

Rajyasabha Election 2022 Live kolhapur
राज्यसभा रणधुमाळी, २४ वर्षांनंतर थेट मतदान, १९९८ ची पुनरावृत्ती होणार?

संभाजीराजे छत्रपती यांच्या रूपाने यापूर्वीही जिल्ह्याला तीन खासदार मिळाले होते. संभाजीराजे यांनीही ही निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते; पण सहावी जागाही शिवसेनेची असल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसने हात वर केले. शिवसेनेने त्यांना पक्षात येण्याची अट घातली, त्यांनी ती अमान्य करून रिंगणातूनच माघार घेतल्याने शिवसेनेने पक्षनिष्ठ पवार यांना सहावा उमेदवार म्हणून संधी दिली.

महाविकास आघाडी व भाजपकडे असलेल्या अतिरिक्त मतांच्या जोरावर या दोघांची उमेदवारी जाहीर झाली. आता अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच अपक्ष आमदारांना मोठा ‘भाव’ आला आहे. अंतिम क्षणी अपक्ष आमदार काय करणार, यावर चित्र अवलंबून आहे; पण निकाल काहीही लागला तरी कोल्हापूरला मात्र तिसरा खासदार मिळणार हे निश्‍चित आहे.

Rajyasabha Election 2022 Live kolhapur
राऊत विधानभवनात पोहोचण्याआधीच कोर्टाचं समन्स, सोमय्यांमुळे पाय खोलात?

‘बंटी-मुन्ना’ यांची प्रतिष्ठा

निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व महाडिक यांच्यातील राजकीय मतभेद पाहता जिल्ह्यात दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विजय कोणाचाही झाला तरी त्याचा कोल्हापुरातील जल्लोष मात्र राज्याचे लक्ष वेधून घेणारा असेल एवढे निश्‍चित.

'महाविकास'चे संख्याबळ

  • शिवसेना - ५६ (लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त)

  • राष्ट्रवादी - ५३ (मात्र नबाव मलिक व देशमुख यांचा मतदानाचा अधिकार नाकारला)

  • काँग्रेस - ४४ (पहिल्या पसंतीची सर्व मते इमरान प्रतापगढी यांना जाणार)

  • बहुजन विकास आघाडी - ३ (हितेंद्र ठाकूर महाविकास सोबत)

  • समाजवादी पक्ष - २ (महाविकासला पाठिंबा)

  • प्रहार जनशक्ती - २

  • शेकाप - १

  • अपक्ष - ८

  • एकूण - १६८

  • भाजप - १०५

  • अपक्ष व इतर पक्ष - १४

  • एकूण - ११९

Rajyasabha Election 2022 Live kolhapur
राऊत विधानभवनात पोहोचण्याआधीच कोर्टाचं समन्स, सोमय्यांमुळे पाय खोलात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.