Emotional Story : पाच मुलांच्या सुखासाठी धडपडणारा असाही बाप..; तिघेजण मूकबधिर-कर्णबधिर, कठीण परिस्थितीतही फुलवला संसार

रमेश यांना श्रेयस, ऐश्‍वर्या, श्रद्धा, श्री आणि समर्थ अशी पाच मुलं; परंतु यापैकी तिघेजण मूकबधिर आणि कर्णबधिर आहेत.
Ramesh Patil Emotional Story
Ramesh Patil Emotional Storyesakal
Updated on
Summary

पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला आई-वडीलही नव्हते आणि बायकोही. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी मुलांना सांभाळलं.

कसबा बावडा : येथे राहणाऱ्या रमेश आणि वंदना पाटील यांचा संसार (Marriage life) अवघ्या तेरा वर्षांचा. आठ वर्षांपूर्वी फुफ्फुसाच्या आजाराने वंदना यांचे निधन झाले आणि घरदार, पोटची पाच लेकरं, शेतीवाडी या सगळ्यांची जबाबदारी रमेश यांच्यावर पडली. मात्र, अशा कठीण परिस्थितीत न डगमगता, न दमता रमेश यांनी एकट्याने संसार सांभाळला, फुलवला.

Ramesh Patil Emotional Story
Mother's Day 2024 : ..गोष्ट पाळणाघरात रमलेल्या आईची! मुलीच्या संगोपणासाठी 'तिने' दिला नोकरीचा राजीनामा

मुलांच्या रूपाने या संसाराला बहर आला. मुलेच माझी खरी ताकद असल्याचे सांगताना रमेश पाटील (Ramesh Patil) यांचा ऊर भरून येतो. असे कष्टाचे जगणे सुखकर करण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची ही गोष्ट. रमेश यांना श्रेयस, ऐश्‍वर्या, श्रद्धा, श्री आणि समर्थ अशी पाच मुलं; परंतु यापैकी तिघेजण मूकबधिर आणि कर्णबधिर आहेत. लेकरांच्या आजारामुळे बाप आधीच धास्तावला. त्यात पत्नी सोडून गेल्यावर तर त्याच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला.

पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला आई-वडीलही नव्हते आणि बायकोही. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी मुलांना सांभाळलं. पडत्या काळात कुटुंबातील इतरांनी दुर्लक्षित केलं; परंतु ते खंबीरपणे उभे राहिले. अर्थार्जनाचे कमी स्रोत असतानाही मुलांना स्वबळावर मोठं केलं. शिक्षणाच्या (Education) प्रवाहात आणलं.

Ramesh Patil Emotional Story
पंचगंगा नदीत प्रदूषण वाढले; दररोज 42 दशलक्ष लिटर मैला, रक्तमिश्रित दुर्गंधीयुक्त सांडपाणी मिसळतंय पंचगंगेत

मुलांसाठी स्वयंपाक नाश्ता, घरची सर्व कामे, भांडी-धुणं, झाडलोट, औषधपाणी, कपडालत्ता, शिक्षण देताना एक बाप म्हणून भूमिका ते पार पाडतात. दोन्ही मुलींपैकी एक दहावीत, तर एक सातवीत शकते. जुळी दोन लहान मुलं तिसरीमध्ये शिकतात. मुलं हुशार असून, हीच माझी सर्व परिस्थिती बदलतील, असा दृढ विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मुलींच्या केसांना तेल लावण्यापासून ते डबा भरून देण्यापर्यंत आई म्हणून सर्व जबाबदाऱ्या ते पार पाडतात. पहाटे पाच वाजता सुरू होणारा त्यांचा दिवस रात्री दहाला संपतो.

Ramesh Patil Emotional Story
Kolhapur Lok Sabha : निवडणुकीत धैर्यशील माने, संजय मंडलिक, शाहू महाराजांनी किती रुपये केलाय खर्च? जाणून घ्या..

श्री आणि समर्थला आईचा सहवास खूप कमी लाभला. या दाम्पत्याने संसाराच्या सुरुवातीला खूप कष्ट घेतले. शेती केली. गायी-म्हैशींच्या दुधावर घर चालविले. कालांतराने स्वतःचे घर बांधले. मात्र, घरात राहायला जायच्या आधीच वंदना यांनी जगाचा निरोप घेतला. ही कटू आठवण सांगताना रमेश यांचे डोळे पाणावले.

माझी पत्नी कष्टाळू होती. नव्या घराचे स्वप्न आम्ही एकत्रित पाहिले होते. माझी पाच मुलं माझी ताकद असून, ती समंजस आहेत. वाढत्या वयाची असली तरी कोणताच हट्ट करत नाहीत. पत्नीनंतर त्यांच्या असण्यानेच माझ्या जीवनाला अर्थ आहे.

- रमेश पाटील, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.