कोल्हापुरात हॉकी स्टेडियमजवळ सापडला दुर्मीळ मांडूळ साप; अंधश्रद्धेमुळे या सापाची कोटीत आहे किंमत

Red Sand Boa Snake : हा साप साधारण तीन फुटांचा आहे. याची सर्वसाधारण लांबी दोन फुटांपासून साडेतीन फुटांपर्यंत असते.
Red Sand Boa Snake
Red Sand Boa Snakeesakal
Updated on
Summary

शेपूट व तोंड एकसारखेच दिसत असल्याने त्याला ‘दुतोंडी’ही म्हणतात. अंधश्रद्धेमुळे या सापाची तस्करी होते. त्याची कोटीत किंमत आहे.

कोल्हापूर : दुर्मीळ असलेला मांडूळ साप (Red Sand Boa Snake) शहरातील हॉकी स्टेडियम (Hockey Stadium) परिसरात आढळला. शोएब टीम ऑफ स्नेक रेस्क्यूच्या सदस्यांना त्याची माहिती मिळताच त्यांनी त्याला पकडून वन विभागाकडे सुपुर्द केले.

स्टेडियमच्या चौकात असलेल्या खाऊ गल्लीजवळील केबिनधारकांनी सागर संकपाळ, साहिल कर्ले, मयूर सुतार, महेश सूर्यवंशी यांना साप आल्याचे सांगितले. त्यानुसार ते तिथे गेले असता तो मांडूळ असल्याचे दिसून आले. त्यांनी या सापाला रेस्क्यू करून वनविभागाच्या वन्यजीव पथकाचे प्रमुख प्रदीप सुतार यांच्याकडे सुपुर्द केले.

Red Sand Boa Snake
पाण्याच्या टाकीत पडून पावणेदोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; तैमूरचा वाढदिवस पुढच्या महिन्यात होता अन्..

हा साप साधारण तीन फुटांचा आहे. याची सर्वसाधारण लांबी दोन फुटांपासून साडेतीन फुटांपर्यंत असते. भारतात खडकाळ, पठारी प्रदेश, किनारी प्रदेश या ठिकाणी तो सापडतो. हा बिनविषारी साप आहे. शेपूट व तोंड एकसारखेच दिसत असल्याने त्याला ‘दुतोंडी’ही म्हणतात. अंधश्रद्धेमुळे या सापाची तस्करी होते. त्याची कोटीत किंमत आहे. यामुळे ही जात नामशेष होण्‍याच्या मार्गावर आहे.

याबाबत माहिती देताना सर्पमित्र गणेश कदम म्हणाले, ‘जवळपास वर्षभरापूर्वी असाच साप तपोवन परिसरात वन विभागाने पकडला होता. जयंती नाल्याच्या काठाचा परिसर त्याच्या अधिवासासारखा आहे. आज सापडलेला साप पूर्ण वाढ झालेला आहे. यातून शहर परिसरातही त्याचा आढळ स्पष्ट होत आहे.’

Related Stories

No stories found.