Masai Pathar : मसाई पठारावर स्टंटबाजीचे 'फॅड'; दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना रोखण्याची गरज, दुर्मीळ वनस्पतींना धोका

Masai Pathar Kolhapur : पावसाळा सुरू असल्याने सध्या डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या आहेत. मसाई पठार हे त्यातीलच एक ठिकाण.
Masai Pathar Kolhapur
Masai Pathar Kolhapuresakal
Updated on
Summary

कोल्हापूरपासून जवळचे व पन्हाळगडाला लागून असणारे पर्यटनस्थळ (Kolhapur Tourism) म्हणून मसाई पठार सध्या विकसित होत आहे.

-उत्तम महाडिक

देवाळे : पावसाळा सुरू असल्याने सध्या डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या आहेत. मसाई पठार हे त्यातीलच एक ठिकाण. सध्या मसाई पठारावर (Masai Pathar Kolhapur) निसर्गाची मुक्त उधळण पाहावयास मिळते. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक (Tourists) सहकुटुंब येथे येत आहेत. मात्र, दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या आणि मद्यधुंद अवस्थेत गाड्यांची स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे पठारावरील पर्यटनाला ग्रहण लागले आहे. यामुळे दुर्मीळ वनस्पतींना धोका पोहोचत आहे.

स्टंटबाजीचे हे फॅड वेळीच रोखण्याची गरज आहे. कोल्हापूरपासून जवळचे व पन्हाळगडाला लागून असणारे पर्यटनस्थळ (Kolhapur Tourism) म्हणून मसाई पठार सध्या विकसित होत आहे. शासनही विविध माध्यमांतून या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करत आहे. निसर्गाचा मुक्त आविष्कार लाभलेला या परिसराला पर्यटक सध्या वर्षा सहलीसाठी गर्दी करत आहेत.

Masai Pathar Kolhapur
Jyotiba Dongar : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी आढळले दीड टनाचे प्राचीन दगडी पर्जन्यमापक यंत्र

राज्य शासनाने मसाई पठार व परिसरात असणारी जैवविविधता व अन्नसाखळी टिकून राहावी, येथे असणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या अधिवासासाठी मानवी बाधा येऊ नये म्हणून हे पठार ‘संवर्धित राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे, पण या मोठ्या स्पोर्ट व्हेईकल व रेसिंग बाईक घेऊन येणाऱ्या पर्यटकांकडून गाड्यांवर वेगवेगळे स्टंट करून त्याचे सोशल मीडियावर रिल्स बनवणे, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे स्टेटस ठेवणे, असे प्रकार सुरू आहेत.

यामुळे पठारावरील अनेक दुर्मीळ वनस्पतींचे नुकसान होऊन त्या नष्ट होत आहेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. स्टंटबाज हे नशेत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास ते वाद घालण्यास सुरुवात करतात. याचा नाहक त्रास या परिररात राहणाऱ्या लोकांना रोज होत आहे. पोलिस प्रशासनाने व वन विभागाने या परिसरात गस्त घालून आशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

फुलांच्या हंगामाला बाधा

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मसाई पठारावर विविध रंगांच्या फुलांचा हंगाम सुरू होतो. ज्या-ज्या ठिकाणी अशा रंगीबेरंगी फुलांचे ताटवे येत असतात, अशाच ठिकाणी गाड्या फिरवून स्टंट केल्यामुळे रेसिंग मोटार व मोटारसायकल यांच्या टायरमुळे या ठिकाणांची पूर्ण नासधूस झाली आहे. त्यामुळे या ठिकाणांवरील फुलांच्या वनस्पतींनी बाधा पोहोचत आहे.

Masai Pathar Kolhapur
Jyotiba Dongar : जोतिबा डोंगरावरील गायमुख तलावाला गळती; भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाझरत आहे पाणी

मसाई पठार हे ठिकाण पन्हाळा व कोडोली या दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे पठारावर हुल्लडबाजी करत गाड्यांचे स्टंट करून निसर्गाची नासाडी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे दोन्ही पोलिस ठाण्याला आदेश दिले आहेत.

-आप्पासाहेब पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहूवाडी

मसाई पठारावर गाड्यांची स्टंटबाजी करून वन हद्दीत नुकसान करणाऱ्यांवर वन कायद्यांतर्गत कडक कारवाई करणार आहे. यावर प्रतिबंध बसावा यासाठी पठार व परिसरात वनविभागचे पथक स्थापन करून गस्त घालणार आहे.

-अनिल मोहिते, परिक्षेत्र वनाधिकारी, पन्हाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.