Chiplun Flood : खेड, चिपळूणला पुराचा तडाखा; NDRF ची सहा पथकं दाखल, 105 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

खेड आणि चिपळूणमधील पूर (Chiplun Flood) परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे.
Chiplun Flood NDRF team
Chiplun Flood NDRF teamesakal
Updated on
Summary

चिपळूणमधील मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

रत्नागिरी : खेड आणि चिपळूणमधील पूर (Chiplun Flood) परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चिपळूणमध्ये सहा एनडीआरएफची पथके (NDRF Team) तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी सिंह आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काल खेड आणि चिपळूणमधील पूरपरिस्थितीची संयुक्त पाहणी करून आढावा घेतला. सिंह म्हणाले, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने खेड-चिपळूणमधील नद्यांनी धोका पातळी तर काहींनी इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूणमध्ये एनडीआरएफची पथके ६ ठिकाणी कार्यरत असून परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे.

Chiplun Flood NDRF team
Rangana Fort : सर्वत्र दमदार पाऊस, ना खायला अन्न ना प्यायला पाणी; रांगणा किल्ल्यावर रात्रभर अडकले 16 पर्यटक

चिपळूण व खेड तालुक्यामधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणीही केली. परशुराम घाटात चिपळूणकडून मुंबईकडे एकेरी वाहतूक सुरू केलेली आहे. खेडकडून चिपळूणकडे येणारी लहान वाहने पाली, कळंबस्तेमार्गे चिपळूणकडे सोडण्यात येत आहेत.

Chiplun Flood NDRF team
Chiplun Flood : रत्नागिरीत पावसाचं रौद्ररुप! चिपळूण, खेडला पुराचा वेढा; परशुराम, कुंभार्ली घाटात कोसळल्या दरडी

पूरपरिस्थितीमुळे खेड-दापोली, तळवट खेड- तळवट जावळी, भोस्ते-अलसुरे, खेड-शिर्शी (देवणापूळ), चिंचघर ते बहिरवली, आंबवली बाऊलवाडी (दरड पडल्याने) आणि शिव मोहल्ला ते शिव खुर्द (बौद्धवाडी क्र.१) रस्ते बंद झाले आहेत. शिवाय शिरगाव (बागवाडी), शिरगांव (पिंपळवाडी) शिरगाव (कोंडवाडी), शिरगाव (धनगरवाडी) यांचा संपर्क तुटलेला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख पुलाजवळून एक गाय व एक म्हैस वाशिष्ठी नदीत वाहून गेली आहे.

Chiplun Flood NDRF team
Kolhapur Rain : कोल्हापूरला धुवांधार पावसाने झोडपले; 52 बंधारे पाण्याखाली, रात्री अकराला पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

१०५ कुटुंबे स्थलांतरित

चिपळूणमधील मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ते सर्वजण नातेवाईकांच्या घरी आहेत. खेड तालुक्यात ४५ कुटुंबातील १६६ जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात खेड (खांबतळे झोपडपट्टीमधील २४ कुटुंबातील ९० जणांना तटकरी हॉल येथे.

तर, भोस्ते पुलाजवळील झोपडपट्टीतील ६ कुटुंबातील ३० जणांना डॉ. अलवी यांच्या इमारतीमधील शेडमध्ये, बोरघर (कातकरवाडी) येथील ४ कुटुंबातील २२ जणांना शेजारील वाडीतील घरांमध्ये, खारी (बहुतुलेवाडी) येथील ४ कुटुंबापैकी १४ जणांना शेजारील घरांमध्ये, नांदगाव (माळीवाडी) येथील एका कुटुंबातील दोघाजणांना शेजारील घरांमध्ये आणि चाटवमधील ३ कुटुंबातील ८ जणांना शेजारील घरांमध्ये स्थलांतरीत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.