Rahul Gandhi : शिवरायांच्या विचारातूनच संविधान निर्मिती... राहुल गांधींनी केलं छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण, मोदींवर केली जोरदार टीका

Rahul Gandhi in Kolhapur : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
Rahul Gandhi IN Kolhapur
Rahul Gandhi IN Kolhapur
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी आज कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान याबद्दल मोठं विधान केले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांची ही फक्त एक मूर्ती नाहीये, तेव्हा मूर्ती तयार केली जाते, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्मांना मनापासून स्वीकारतो. कोणी मुर्तीचे अनावरण केले आणि जीवनभर ते ज्या गोष्टींसाठी लढले त्यांच्यासाठी आपण लढलो नाही तर मूर्तीचा काही अर्थ उरत नाही. जेव्हा आपण या मूर्तीचे अनावरण करतो, तेव्हा आपण हे वचन देखील घेतो की ज्या पद्धतीने ते जगले, त्यांच्या इतके नाही पण थोडेफार तर आपण देखील केले पाहिजे."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला काय संदेश दिला? त्यांच्या विचारांचे आज कोणते चिन्ह अस्तित्वात आहे तर हे (संविधान) आहे. थेट कनेक्शन आहे. जे शिवाजी महाराजांनी सांगितले, २१ व्या शतकातील त्याचे भाषांतर हे (संविधान( आहे. यामध्ये तुम्हाला अशी एकही गोष्ट आढळणार नाही ज्यासाठी ते लढले नाहीत. संपूर्ण आयुष्यभर ते लढले, त्यांनी जे काही कामे केली, त्याच विचारातून हे संविधान जन्माला आले. दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक नसते तर हे (संविधान) अस्तित्वात नसते" असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Rahul Gandhi IN Kolhapur
Sharad Pawar: आयाराम वाढवणार पवारांच टेंशन; या निष्ठावान नेत्याने दिला बंडखोरीचा इशारा

भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे, एक विचारधारा जी याचे (संविधान) रक्षण करते. समानता आणि एकतेचा मुद्दा उपस्थित करते, जी छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा आहे. आणि दुसरी विचारधारा संविधान संपवण्याच्या प्रयत्नात आहे. सकाळी उठतात आणि योजना आखतात की शिवाजी महाराज यांच्या विचारांचे जे संविधान आहे ते कसे संपवता येईल. हिंदुस्थानच्या संस्थांवर हल्ले करतात, लोकांना भीती घालतात आणि नंतर जाऊन शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर डोकं टेकवतात. हे काही कामाचे नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

जर तुम्ही शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलत असाल तर तुम्हाला संविधानाची रक्षा केलीच पाहिजे. विचारधारा खूप जूनी आहे. त्यांच्या काळात देखील हीच लढाई सुरू होती. जेव्हा त्यांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा देखील त्याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही लढाई हजारो वर्ष जुनी आहे. आणि त्याच विचारधारेची ही लढाई आहे, ज्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले होते. त्याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Rahul Gandhi IN Kolhapur
PM Modi in Thane: मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी !

त्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती उभारली आणि काही दिवसातच ती कोसळली. कारण त्यांचा उद्देश चुकीचा होता. मूर्तीने त्यांना संदेश दिला तुम्ही जर शिवाजी महाराजांची मूर्ती बनवत असाल तर त्यांच्या विचारधारेची रक्षा करावी लागेल, म्हणूनच ती मूर्ती कोसळली, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.