आमदार क्षीरसागरांकडून जीवे मारण्याची धमकी; इंगवलेंची पोलीस अधीक्षकांकडं तक्रार

Rajesh Kshirsagar vs Ravikiran Ingawale
Rajesh Kshirsagar vs Ravikiran Ingawaleesakal
Updated on
Summary

शिवसेनेत वाद उफाळून आला असतानाच कोल्हापुरातही दोन माजी शहरप्रमुखामध्येही वादाला उकळी फुटलीय.

Maharashtra Political Crisis : राज्यात शिवसेनेत (Shiv Sena) वाद उफाळून आला असतानाच कोल्हापुरातही दोन माजी शहरप्रमुखामध्येही वादाला उकळी फुटलीय. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) व माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांच्यातील या वादात दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिल्यानं वाद टोकाला पोहोचलाय.

माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून गुवाहाटीतून शेअर केलेल्या व्हिडिओमधून मला जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज, सोमवारी पोलिस अधीक्षकांकडं निवेदनाद्वारे केलीय. इंगवलेंनी शिवाजी पेठेतील जनता बझारच्या दारात नव्यानेच सुरु केलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयावर लावलेला क्षीरसागर यांचा फलक शनिवारी (दि. २५) फाडून टाकला होता. त्याची दखल घेत क्षीरसागर यांनी व्हिडिओ शेअर करत इंगवलेंना धमकीवजा इशारा दिला.

Rajesh Kshirsagar vs Ravikiran Ingawale
कोरेगावात बंडखोर आमदार महेश शिंदे समर्थकांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

त्यामध्ये त्यांनी इंगवले यांना तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. तू माझ्या नादाला लागू नकोस, अन्यथा सोडणार नाही अशी थेट धमकीच दिली होती. त्या व्हिडीओच्या आधारे इंगवले यांनी पोलिस अधीक्षकांकडं ही तक्रार केलीय. दरम्यान, क्षीरसागर यांनीच इंगवले यांना शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. परंतु, गेल्या सहा महिन्यापूर्वी या दोघांत वाद सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणून इंगवले यांचे पद तडकाफडकी काढून ही जबाबदारी जयवंत हारुगले यांना देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()