कोल्हापूर : कोरोना (Covid 19) पासून बचावासाठी लस टोचुन घेणं हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. पण लसीकरणा नंतर काहींना प्रचंड अंगदुखी, थंडी-ताप,(Fever) डोके दुखी असा त्रास होतो. तर काहींना फारसा त्रास जाणवत देखील नाही. लसीच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी शरीरात अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) (Antibodies)निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शरीरात सुरु असणाऱ्या लढ्याचे दृश्य स्वरूप थंडी - ताप, अंगदुखी, दंड दुखणे अशा लक्षणांच्या स्वरूपात दिसते.
reason after vaccination fever information covid 19 update kolhapur news
ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांना लसीकरणा नंतर अधिक त्रास जाणवत असल्याचे दिसुन येत आहे. ही लक्षणे दोन-तीन दिवसच टिकतात.परत फ्रेश वाटायला लागतं. त्यामुळे लस घेतल्यानंतर घाबरण्याची गरज नाही.असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
वेगवेगळ्या आजाराला प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असते. कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर कमी अधिक प्रमाणात शरीराचे तापमान वाढते. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हा प्रतिसाद अवलंबून असतो. लसीच्या बाबतीतही असेच आहे. त्यामुळे लस घेतल्यावर एखाद्याला अधिक किंवा कमी त्रास होतो. मात्र त्रास न झाल्यास आपल्या शरीरासाठी लस परिणामकारक ठरलेली नाही. असे समजण्याचे कारण नाही. असे तज्ञ सांगतात.
लस घेतल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरात योग्य प्रमाणात अँटिबॉडी तयार होतात. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणार नाही असे नाही. परंतु, भविष्यात हा आजार झाल्यास गुंतागुंत कमी होते. त्यामुळे लस घेतलेली असली तरी संसर्ग श्रृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे या उपाययोजना करत राहणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
इम्युन रिस्पॉन्स गरजेचा
लसीकरणामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविंशिल्ड, तसेच भारत बायोटेकची कोव्हेंकसिन या लसींचा वापर केला जात आहे. दोन्ही लसींच्या मानवी चाचण्या पूर्ण होऊन त्यांची परिणामकारकताही सिद्ध झाली आहे. कोणतीही लस घेतल्यावर शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हायला लागते. त्याला इम्युन रिस्पॉन्स असे म्हणतात. त्यामुळे दोन-तीन दिवसांत थोडा त्रास जाणवू शकतो, असेही डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.
म्हणुन होतो त्रास.
लसीतून टोचलेल्या मृत विषाणूला शरीर प्रतिकार करत असल्याने अंगदुखी, दंड सुजणे, ताप अशी लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाची अॅलर्जी असले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी.त्रास जाणवल्यास कोणतेही पेनकिलर औधष न घेता लसीकरण केंद्रावर देणात आलेल्या पॅरासिटामॉल औषध घ्याण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
विश्रांती घेणे गरजेचे
लस घेतल्यानंतर विषाणू विरोधात लढा सुरू होतो आणि त्यामुळे शरीरातील दाह (डफ्लमेशन) होतो. याचाच परिणाम लक्षणांच्या स्वरूपात दिसतो. तरुणांची प्रतिकारशक्ती जास्त असते. तर ज्येष्ठांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती तुलनेत कमी असते. त्यामुळे तरुणांना लसीकरणानंतर जास्त त्रास होतो. तर वयस्कर नागरिकांना कमी त्रास होतो. संपूर्ण एक दिवस विश्रांती घेतल्यावर त्रास कमी होतो.
कोरोना लस ही आरोग्यासाठी लाभदायी आहे. यामुळे शरीरातील अँटीबॉडीज वाढतात. या अँटीबॉडीज कोरोना विषाणूविरोधात लढतात. लसीकरणा नंतर काही दिवसांनी शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते. परंतु पुढे ही कोरोना प्रतिबंधीत त्रिसूत्रीचे पालन करावे. -
डॉ.उमेश कदम,अधिक्षक - सेवा रुग्णालय
reason after vaccination fever information covid 19 update kolhapur news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.