पाण्यापासून ऊर्जानिर्मिती ; कोल्हापूरच्या डॉ. गुंजकर यांचे संशोधन

research of dr. jaywant gunjakar on create power with water in kolhapur
research of dr. jaywant gunjakar on create power with water in kolhapur
Updated on

कोल्हापूर : नैसर्गिक इंधनसाठा कधी ना कधी संपुष्टात येणार आहे. हा धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर अपारंपरिक ऊर्जास्त्रोतनिर्मितीवर संशोधन सुरू आहे. यामध्ये स्वच्छ इंधन म्हणून हायड्रोजनकडे संशोधकांचा कल वाढला आहे. हायड्रोजन निर्मितीसाठी  विविध पद्धती समोर येत आहेत. अशाच पद्धतीने ‘टु डायमेन्शनल नॅनो मटेरियल्स’च्या वापरातून पाण्यापासून हायड्रोजन- निर्मितीबाबत कोल्हापूरच्या डॉ. जयवंत लक्ष्मण गुंजकर यांनी संशोधन केले आहे. तसेच तयार होणारी ऊर्जा बॅटरीमध्ये कशी साठवून ठेवता येईल, या विषयावरही त्यांनी संशोधन केले आहे.

डॉ. गुंजकर मूळचे आजरा तालुक्‍यातील कोवाडेचे. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण राजाराम कॉलेजमधून झाले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातून एमएस्सी व पीएचडी संपादन केली. २००९ साली साऊथ कोरियातील इव्हा वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्‍टरल रिसर्चसाठी त्यांची निवड झाली. त्यांनी २००९ ते २०१६ या कालावधीत रिसर्च प्रोफेसर पदापर्यंत मजल मारली.

२०१७ साली डोंगुक विद्यापीठात सेऊल येथे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत भारत सरकारच्या विज्ञान आणि इंजिनिअरिंग अनुसंधान बोर्डातर्फे त्यांना रामानुजन फेलोशिप जाहीर केली. या फेलोशिपच्या माध्यमातून त्यांना सव्वा कोटींची स्कॉलरशिप प्रदान केली. जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटी व एनर्जी ॲण्ड एनव्हायर्न्मेंट सायन्स यामधून त्यांचे शोधनिंबध प्रसिद्ध झाले आहेत. ते सध्या डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत आहेत.

नऊ पेटंट नावावर

डॉ. गुंजकर यांनी नऊ पेटंट मिळवले असून, यामध्ये पाच कोरिअन पेटंट व चार इंडियन पेटंटचा समावेश आहे. त्यांची ‘नॅनो मटेरिअल्स’ विषयावर तीन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांची इंडियन नॅशनल यंग ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या नामांकित संस्थेत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीमध्ये सात विद्यार्थी पीएच.डी. करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.