शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या २८ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल पाहता समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली प्रत व प्रत्यक्ष ठराव यात फरक आहे.
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीत (Shingnapur Gram Panchayat) मुस्लिम मतदारांची (Muslim Voters) नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आल्याचे पत्र समाज माध्यमात प्रसिद्ध झाले. हे पत्र दिशाभूल करणारे असून, बांगलादेशी अल्पसंख्याकांबाबत तो ठराव केला असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले, तर ग्रामसभेत ते पत्र अधिकृत नसल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.