इचलकरंजी : परराज्यातून येणाऱ्या नगारिकांमुळे शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. काही दिवसांपासून शहरात आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांचा परराज्यातील प्रवासाचा इतिहास असल्याचे प्रशासनाला दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांवर आता प्रशासनाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम कोरोनाचा संसर्ग इचलकरंजीत वाढला होता. त्यानंतर आयजीएम रुग्णालयाला स्वतंत्र कोरोना रुग्णालयाचा दर्जा दिला होता. पालिका प्रशासनानेही कोविड केअर सेंटर सुरू केले होते. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे शहरातील कोरोना संसर्ग लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली. मृतांची संख्या 194 वर महिनाभरापासून स्थिर आहे. त्यामुळे मृत्युदर कमी झाला आहे.
शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असतानाच काही दिवसांपासून अधूनमधून कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांशी रुग्णांचा प्रवासाचा इतिहास असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. परराज्यातून आलेल्या बहुतांशी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचा पुन्हा एकदा सर्व्हे करण्याची वेळ आली आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण बाधित रुग्ण - 4013
कोरोनामुक्त रुग्ण - 3810
एकूण मृत - 194
ऍक्टिव्ह रुग्ण - 9
सपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.