Sharad Pawar Rally: कोल्हापुरातील लोक आपल्या वाहनांची नावे चांद्रयान ठेवायला लागलेत; रोहित पाटील यांचा टोमणा

ROHIT PATIL
ROHIT PATILESAKAL
Updated on

Rohit Patil speech in NCP chief Sharad Pawar rally in kolhapur

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूरमध्ये सभा घेत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. तसेच २०२४ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. आज कोल्हापूरमध्ये लोकांनी त्यांच्या गाड्यांचे नाव चांद्रयान ठेवायला सुरुवात केली आहे. कारण त्यांना कोल्हापूरात चंद्रावर आल्यासारखं वाटत आहे, अशी मिश्किक टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

कोल्हापूर शहराने नेहमीच आपली वेगळी अस्तिस्व निर्माण केलं आहे. जिल्ह्याने वेगळा प्रवाह निर्माण केला आहे. देशात कोणतीही चळवळ निर्माण करायची झाली, तर दसरा चौकातून चळवळ सुरु केली जाते. त्या दसरा चौकामध्ये आज सभा होत आहे. शरद पवारांना प्रेम देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही येथे उपस्थित राहिलात त्यासाठी त्यासाठी सर्वांचे आभार, असं रोहित पाटील म्हणाले.

ROHIT PATIL
Sharad Pawar : महाराष्ट्राला लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-२ बघायला मिळणार; काँग्रेस नेत्याचं सूचक विधान

२४ वर्षापूर्वी कोल्हापूरच्या याच भूमिमध्ये शाहू-फूले- आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. या राज्यांच्या लोकांना न्याय देण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी हा पक्ष स्थापन केला. गेल्या २४ वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय या पक्षाकडून घेण्यात आले. देशात शेतकऱ्यांचा वाली असा कोणी जन्माला आला नव्हता. शेतकरी अडचणीत असताना आतापर्यंत सर्वात मोठी कोणी कर्जमाफी दिली असेल तर शरद पवार यांनीच दिलीये,असं ते म्हणाले

ROHIT PATIL
Ajit Pawar Vs Sharad Pawar : आता फोटो लावू देणार का ? शरद पवारांच्या त्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने विचारले गंभीर प्रश्न !

जे शेतकरी आपला हक्क मागत होते, त्यांच्यावर गाड्या घालण्यात आल्या. शाहु महाराजांचा विचार जोपासण्याची वेळ आली आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे की या मातीची पुन्हा एकदा मशागत करण्याची वेळ आली आहे. आणि पवारांच्या नेतृत्वात आपल्याला याचा वटवृक्ष उभा करायचा आहे, असं ते म्हणाले.

ROHIT PATIL
Sharad Pawar : ...तर त्यांचं म्हणणं मान्य करेन; कांदाप्रश्नी शरद पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर

शाहू महारांच्या भूमिमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोल्हापूरमध्ये आयटी पार्कची निर्मिती केली जावी. सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट करणे गरजेचं आहे. २०२४ मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे. आणि केंद्रातील सरकारला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.