कोल्हापूर : उथळ कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांचे नाव न घेता पत्रकाद्वारे लगावला. परमेश्वरी कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, असे सांगत मुरगूडच्या कार्यकर्त्यांनी राधानगरीच्या धरणावर गोमूत्र शिंपडण्याची भूमिका घेतली आहे; मात्र हे कृत्य करू नये, असे आवाहन मुश्रीफ यांनी यावेळी केले. (rural-development-minister-hasan-mushrif-criticism-on-samarjit-singh-ghatge-political-marathi-news)
पत्रकात म्हटले आहे, जिल्हा कोरोना परिस्थितीमध्ये चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे सर्वच कार्यक्रमांना बंदी आहे. परवानगी मागितली तरी शासकीय अधिकारी परवानगी देणारच नाहीत, मात्र परवानगी मिळाली नाहीतर, कोणाच्यातरी सांगण्यावरून दिली नसल्याचे सांगून नाही, सहानुभूती मिळवायची. त्यातून प्रसिद्धी मिळवायची, असा बालिश प्रकार सुरू असल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
पत्रकात म्हटले आहे, परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे. कोरोना काळामध्ये जनतेच्या सुख-दुःखामध्ये सामील होऊया. विकासकामे करण्याची सुवर्णसंधी आली आहे. गावागावांतील विकासकामे अशी करूया की, जनता शंभर वर्षे आपले नाव काढेल. जनतेने नाकारलेल्याना दुसरे कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून उथळपणाची कृती सुरू असल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी पत्रकात लगावला.
लोक त्यांना ओळखून आहेत
उच्च न्यायालयात धरणाचे काम थांबवणारे, घळभरणी करू नये असा प्रयत्न करणारे, प्रकल्पग्रस्तांना विनाकारण उचकवून उत्तूर विभागासह कडगाव-गिजवणे विभागातील लोकांना वंचित ठेवणाऱ्यांना त्या भागातील जनता चांगलेच ओळखून आहे. लवकरच धरण पूर्ण भरेल व सर्व कार्यकर्त्यांसोबत त्या पाण्याचे दर्शन लवकरच घेऊ, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
मंगळवारी गोमूत्र शिंपडण्याचा मुहूर्त
मुरगूडच्या जनतेला पाणी पाणी करायला लावणाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, अशी विनंती आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील वंशजांना केली होती; परंतु आमची विनंती धुडकावत त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिवशीच ती पवित्र भूमी कलंकित केली. ती पुन्हा पवित्र करण्यासाठी मंगळवारी गोमूत्र शिंपडण्याचा मुहूर्त शोधल्याचे पत्रक राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या मुरगूड शहरातील कार्यकर्त्यांनी काढले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.