कोल्हापुरची हद्दवाढ गरजेची: हसन मुश्रीफ

Rural Development Minister Hasan Mushrif
Rural Development Minister Hasan Mushrif
Updated on
Summary

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याच उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हद्दवाढीचे समर्थन करीत खळबळ उडवून दिली.

कोल्हापूर: कोल्हापुरची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर महापालिका यशस्वी ठरणार नाही. गरजच लागल्यास कागल देखील हद्दवाढीत येत असेल, तर माझा पूर्ण पाठिंबा असेल, असे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शहराच्या हद्दवाढीचे समर्थन केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याच उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हद्दवाढीचे समर्थन करीत खळबळ उडवून दिली.

Rural Development Minister Hasan Mushrif
घरगुती गणेशाच्या सजावटीत कोल्हापुरी फेट्यांची क्रेझ

हसन मुश्रीफ हे, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्‌ अँड इंजिनिअर्सच्या ५० व्या वर्धापन दिनात बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘शहराला लागून असणारे रस्ते कृत्रिम बांधाचे काम करत आहेत. रस्ते देखील दळणवळणासाठी व विकासासाठी महत्त्वाचे आहेत. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स यांनी मिळून आराखडा बनवणे आवश्यक आहे. सातत्याने येणारा पूर धोकादायक असून, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची हीच खरी वेळ आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.