साडेचार हजारांहून अधिक दुचाकीची विक्री ; पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी 

Sales of more than four and a half thousand bikes in kolhapur
Sales of more than four and a half thousand bikes in kolhapur
Updated on

कोल्हापूर - दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे साडेचार हजारांहून अधिक दुचाकींची विक्री झाली आहे. खरेदीवर कोरोना महामारीचा परिणाम जाणवेल असा विक्रेत्यांचा अंदाज ग्राहकांनी धुडकावून लावला आहे. विशेष म्हणजे बहुतांशी ग्राहकांनी रोख रक्कमेतून या दुचाकींची खरेदी केली आहे. कर्जासाठी कमी व्याजदर असतानाही ग्राहकांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. 

बीएस-6 च्या नव्या श्रेणीमुळे दुचाकींसह सर्वच वाहनांची किंमत वाढली आहे. तसेच कोरोना महामारीमुळे अर्थकरण थांबले. यामुळे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकींसह इतर वाहनांच्या खरेदीवर परिणाम होईल, असा अंदाज विक्रेत्यांचा होता. मात्र या दिवाळी पाडव्याला जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांकडून सुमारे साडेचार हजार दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. गेली दोन वर्षे दुचाकींसह ऍटोमोबाईल सेक्‍टर मध्ये मंदीचे वातावरण होते. पुण्यासारख्या दुचाकी उत्पादनाच्या ठिकाणी केवळ एका शिफ्ट मध्ये पंधरा दिवस काम चालत होते. त्याचा कळत न कळत परिणाम कोल्हापूर सारख्या ठिकाणीही झाला होता.

ऍटोमोबाईल सेक्‍टरसाठी बहुतांशी सुटेभाग कोल्हापुरातून जातात. त्यामुळे कोल्हापूरच्या अनेक कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र आता पुन्हा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकींच्या विक्रीची संख्या कोरोना महामारीनंतरही चढीच राहिली आहे. यामुळे बाजार पुन्हा रुळावर आल्याची प्रतिक्रीया विक्रेत्यांकडून दिली जात आहे. 
-सारिका जाधव, सरपंच दोनवडे

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.