Kagal Politics : कागलमध्ये हाय व्होल्टेज लढत, ती कशी हे मी आत्ताच सांगणार नाही; महाडिकांचं सूचक वक्तव्य

सर्वच निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadikesakal
Updated on
Summary

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा आतापर्यंत केवळ मतांसाठीच वापर केला आहे.

कागल : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. सध्याचा काळ भाजपासाठी सुवर्णकाळ आहे.

हे पहाता येत्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsingh Ghatge) हेच कागलचे पुढील आमदार असतील. मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

येथील श्रीराम मंदिरमधील सभागृहात भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्याबद्दल आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनावेळी ते बोलत होते.

Dhananjay Mahadik
उदयनराजे-शिवेंद्रराजे वादाची प्रदेशाध्यक्षांनी हवाच काढली; बावनकुळे म्हणाले, रस्त्यावरची भांडणं ही भाजपची..

खासदार महाडिक (Dhananjaya Mahadik) म्हणाले, ‘केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ध्यास घेतलेल्या समरजितसिंह घाटगे यांना आमदार करुनच या अभियानाची यशस्वीपणे सांगता करुया.’

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे. समाजातील सर्व थरातील नागरिकांसाठी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. विशेषतः साखर कारखानदारीला त्यांच्यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या गतिमान योजना व लोकहिताची निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत भाजपचे कार्यकर्त्यांनी पोहोचवावेत.

Dhananjay Mahadik
Mahabaleshwar : ट्रॅक पँट अन् ब्ल्यू टी शर्ट.. मुख्यमंत्री रमले शेतात, पत्नीसह केली केळी-नारळाची लागवड

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा आतापर्यंत केवळ मतांसाठीच वापर केला आहे. त्यांच्या आरक्षणासाठी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार इंपिरीकल डेटा गोळा करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर येताच कोर्टाच्या आदेशानुसार इंपिरीकल डेटा गोळा करून कोर्टात सादर केला.’

स्वागत अमोल शिवई यांनी केले. प्रास्ताविक डॉ.आनंद गुरव यांनी केले. आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.यावेळी तालुकाध्यक्ष संजय पाटील, विजया निंबाळकर, सुधा कदम, रेवती बरकाळे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Dhananjay Mahadik
ED च्या रडारवर असलेल्या मुश्रीफांच्या पोस्टरवर झळकले CM शिंदे, फडणवीसांचे फोटो; उलट-सुलट चर्चांना उधाण

लढत मोठी पण सोपी...

यावेळी खासदार महाडिक यांनी कागलमध्ये विधानसभेसाठी हाय व्होल्टेज मोठी लढत होईल. ही लढत मोठी वाटत असली तरी सोपी होणार आहे. मात्र ती कशी हे आपण आत्ताच सांगणार नाही, असे सूचक वक्तव्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.