Sambhaji Chhatrapati: "पुतळा बदला अशी आधीच मोदींकडं केली होती मागणी"; मालवणच्या घटनेनंतर संभाजी छत्रपती भडकले, दाखवला पुरावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज सकाळी कोसळला.
Shivaji Maharaj Statue
Shivaji Maharaj Statue
Updated on

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज सकाळी कोसळला. या घटनेनंतर शिवरायांचे वारसदार संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. हा पुतळा बदलण्याच्या मागणीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं, याची आठवण करुन देताना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरातच कोसळलं यासारखी दुर्देवी बाब नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.