कोल्हापूर : गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई (Punitive action)केली जाणार आहे. वाळूचा प्रतिब्रास (SAND EACH BRASS RATE)६ हजार ६५४ रुपये दर आहे. हीच वाळू बेकायदेशीर उपसली किंवा वाहतूक केली तर प्रतिब्रास पाचपट दंड व रॉयल्टीची रक्कम अशी एकूण प्रतिब्रास ३३ हजार ८७० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासह इतर गौण खनिजांवरही दंडाची रक्कम निश्चित केली आहे.
जिल्ह्यात काळा दगड, नदीतील वाळू, कृत्रिम वाळ, मुरूम, माती, सीलिका सॅन्ड, जांभा, चिरा दगड, खडी व ग्रीट अशा गौण खनिजांची बेकायेदशीर उत्खनन आणि वाहतूक केली जात आहे. महसूल अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच किंवा रॉयल्टी न भरताच हा उद्योग सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. काही ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच व्यवसाय सुरू आहे. याला आळा बसवा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी(kolhapur collector) बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांना वेळेत सुधारण्याचा इशारा दिला आहे. बेकायदेशीर वाहतूक किंवा उत्खनन होत असल्यास कारवाई करण्याचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना आदेश दिले आहेत. उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही कारवाईच्या सूचना प्रशासनाकडून (kolhapur administration)दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.