Keshavrao Bhosale Theatre Fire : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी तात्काळ 10 कोटींचा निधी जाहीर; राजेश क्षीरसागर यांची माहिती

Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire : शासनाकडून १० कोटींची मदत तात्काळ मंजूर करण्यात आली आहे.
Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire
Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fireesakal
Updated on
Summary

''अचानक लागलेल्या आगीने ऐतिहासिक वास्तू डोळ्यासमोर जळणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. सरकार या वास्तूच्या पुनः उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल.''

कोल्हापूर : नावाप्रमाणेच राजेशाही थाट निभावणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी (Keshavrao Bhosale Theatre Fire) आहे; पण या वास्तूच्या पुन:उभारणीसाठी तात्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

घटनास्थळी राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी तातडीने धाव घेत आवश्यक सूचना उपस्थित जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासनास दिल्या. दरम्यान, क्षीरसागर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ टर्न टेबल लॅडर, विमानतळ प्रशासनाचे अग्निशमन वाहन पाचारण केले.

Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire
Keshavrao Bhosale Theatre : कोल्हापूरचा मानबिंदू केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीत बेचिराख; नेमकं काय घडलं अन् कशामुळं लागली आग?

या संपूर्ण घटनेची माहिती क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविली. संपूर्ण घटनाक्रमात राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहितीही क्षीरसागर यांनी दिली.

Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire
Keshavrao Bhosale Theatre Fire : राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेला वारसा पुन्हा नव्याने उभारू...

यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी, संपूर्ण नुकसानीची माहिती घेता अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे दिसते. शासनाकडून १० कोटींची मदत तात्काळ मंजूर करण्यात आली आहे. अचानक लागलेल्या आगीने ऐतिहासिक वास्तू डोळ्यासमोर जळणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. सरकार या वास्तूच्या पुनः उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल. यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या आमदार, खासदार फंडातून निधी देवून कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.