Sangli : दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करा; पालकमंत्री सुरेश खाडे

पालकमंत्री खाडे यांच्या‎ अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते.
sangli
sanglisakal
Updated on

सांगली - शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार‎ निविष्ठा, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व वाजवी दरामध्ये‎ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने‎ सूक्ष्म नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कोणतीही समस्या उद्‌भवणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत दिल्या.

sangli
Mumbai : प्रवाशांना मोठा दिलासा! पश्चिम रेल्वेवर आणखी ५० उन्हाळी विशेष गाड्या

पालकमंत्री खाडे यांच्या‎ अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते.

बैठकीत हुमनी कीड व्यवस्थापन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या भित्तिपत्रिकेचे अनावरण झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.

पालकमंत्री खाडे म्हणाले, ‘‘जलसंपदा विभागाने समाधानकारक पाऊस पडेपर्यंत सर्व उपसा सिंचन योजना सुरू ठेवाव्यात.

sangli
Mumbai : कोट्यवधी रुपये खड्ड्यात; मुंबईत १४ हजार खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण

विजेअभावी पिकांचे नुकसान होऊ नये व उपसा सिंचना योजना या कालावधीत सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा अखंडित राहील, याची दक्षता घ्यावी.’’

कृषी विभागाचे खरिपासाठी सूक्ष्म नियोजनाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले की, खरिपासाठी ३८ हजार १७ क्विंटल बियाणांची मागणी केली. त्यात भात पिकाचे ६ हजार ७३२, ज्चारी ५ हजार ६६५, बाजरी २ हजार २०, तूर ६२१, मूग २४७, उडीद ८५१, भूईमूग १ हजार ४६८, सूर्यफूल १२९, सोयाबीन १३ हजार ५८६,

मका ६ हजार ६९८ क्विंटलचा समावेश आहे. खरिपासाठी १ लाख ८९ हजार ३५४ टन खतांची मागणी केली आहे. त्यात युरिया ५२ हजार १०० टन, डी.ए.पी.- २० हजार ८९१ टन, एम.ओ.पी.- २१ हजार १७५ टन, एस.एस. पी.- ३० हजार २८६ टन आणि संयुक्त खतांचा ६४ हजार ९०२ टनांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.