कोल्हापूर : सॅनिटायझर, मास्क व्यवसायात नफ्याचे अमिष; चौघांवर गुन्हा

Sanitiser-Mask
Sanitiser-Masksakal
Updated on

कोल्हापूर : सॅनिटायझर, हँन्डग्लोज, मास्कच्या व्यवसायात मोठ्या नफा मिळवून देण्याचे अमिषाने १ कोटीहून अधिकचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. रोहित हरिष नागदेव, राहूल हरिष नागदेव, हरिष बलीराम नागदेव (तिघे रा. महालक्ष्मी पार्क सोसायटी, हॉकी स्टेडियम परिसर) आणि शाम पल्लोद अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sanitiser-Mask
'ते' पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची मदत थांबवतील : PM मोदी

पोलिसांनी सांगितले की, संतोष मोहन पोवार हे राजारामपुरी परिसरात राहतात. त्यांचा मोटार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. जिलानी मुल्ला आणि समीर भालदार हे त्यांचे व्यवसायिक सहकारी आहेत. त्यांचे शाहूपुरी येथे कार्यालयही आहे. संशयित रोहित, राहूल, हरिष नागदेव आणि शाम पल्लोद हे मोटार खरेदी करण्याच्या बहाण्याने कार्यालयात गेले. येथे त्यांनी पोवार व त्यांच्या सहकारी मित्रांची ओळख करून घेतली. संशयितांनी कोरोना संकटामुळे त्यांच्या व्यवसायात आलेल्या मंदीचा अंदाज घेतला. त्यानी पोवार व त्यांच्या व्यवसायिक सहकाऱ्यांना सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, मास्क, पीपीई कीट, ऑक्सीमीटर, फेस शिल्ड या वस्तूंची ऑर्डर घेऊन त्याचा व्यवसाय करतो आणि मोठा नफा मिळवून देतो.

Sanitiser-Mask
भोरकडे वळताहेत पर्यटकांची पावले

असे अमिष दाखवले. सुरवातीला पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येकी दीड लाख प्रमाणे साडेचार लाख रूपये त्यांना दिले. त्याच पैशांतून व्यवसायात नफा झाल्याचे संशयितांनी भासवून त्यांना नफ्याचा परतावा दिला. त्यानंतर संशयितांनी मोठी ऑर्डर मिळाल्याचे सांगून त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांच्याकडून त्यानी वेळोवेळी अशी १ कोटी पाच लाख १५ हजार ५०० रूपये घेतले. पण व्यवसायात गुंतवलेली मुद्दल अगर त्याचा नफा दिला नाही. हा प्रकार ३ मे २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ अखेर घडल्याची फिर्याद पोवार यांनी दिली. त्यानुसार चौघा संशियतांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()