LokSabha Election : लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार ठरले! कोल्हापुरातून 'हे' नेते लढवणार निवडणूक? महाडिकांनी दिले स्पष्ट संकेत

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून याबद्दलचा निर्णय घेतील'
Kolhapur Loksabha Election
Kolhapur Loksabha Electionesakal
Updated on
Summary

जिल्ह्यातील दोन्ही खासदार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे मंडलिक, माने यांचीच लोकसभेला उमेदवार म्हणून दावेदारी असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे (Kolhapur Loksabha Election) जागा वाटप महायुतीमधील पक्षांनुसारच होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशिल माने (Dhairyasheel Mane) यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दावेदारी असल्याचे संकेत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पत्रकार परिषदेत दिले.

Kolhapur Loksabha Election
Ravikant Tupkar : तेच तेच म्हणणे कितीवेळा मांडू? तुपकरांचा राजू शेट्टींना उद्विग्न सवाल; दहा पानांच्या पत्रातून भूमिका जाहीर

यावेळी त्यांनी संसदेच्या अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबद्दलच्या प्रश्‍नावर खासदार महाडिक म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील पक्षांच्या विद्यमान जागांप्रमाणेच जागा वाटप होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून याबद्दलचा निर्णय घेतील.

मात्र, जिल्ह्यातील दोन्ही खासदार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे मंडलिक, माने यांचीच लोकसभेला उमेदवार म्हणून दावेदारी असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संसदेच्या अधिवेशनात २२ प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. ९ विषय राज्यसभेत मांडले. विधेयकांवरील चर्चेतही सहभागी होता आले. मंत्र्यांबरोबर झालेल्या ११ बैठकांमध्ये सहभागी झालो. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवल्याने राज्यसभेत सामान्यांच्या प्रश्नांचा वाचा फोडली. खासदार झाल्यापासून कोल्हापुरातील बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत.

Kolhapur Loksabha Election
NCP Crisis : राजकीय घडामोडी सुरु असताना अजितदादा शरद पवारांना का भेटले? अखेर कारण आलं समोर; खुद्द दादानीच केला खुलासा

विमानतळाचे विस्तारीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल. छत्रपती राजाराराम महाराजांचे नाव विमानतळाला देण्याचा प्रस्तावही केंद्राकडे पाठवला आहे. कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गाचे काम आता पंतप्रधान गती शक्ती प्रकल्पांतर्गत होणाऱ्या प्रकल्पांमध्ये समाविष्ट झाले आहे. त्यामुळे त्यासाठी ३ हजार ४११ कोटी रुपयांची तरतूद होणार आहे. कोल्हापूर-मुंबई वंदेभारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली असून लवकरच ती सुरू होईल.

Kolhapur Loksabha Election
Kolhapur Ganeshotsav : एक दिवस तुमचा, पुढील 364 दिवस आमचे असतील; साऊंड सिस्टीमबाबत पोलिस अधीक्षकांचा थेट इशारा

ई.एस.आय हॉस्पिटलसाठी ९ कोटीपैकी ४ कोटी रुपयांचा मिळाला आहे. त्यातून १०० बेडचे हॉस्पिटल सुरू होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस सेंटर, केंद्रीय विद्यालयासाठी जागेची निश्चितीही झाली आहे. बास्केट ब्रिजची फेरनिविदा होण्याची शक्यता असल्याने अजून काम सुरू झालेले नाही लवकरच ते मार्गी लागेल. पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.