विरोधी गटातून निवडून आलेले 'हे' दोन संचालक सेनेच्या गळाला?

Sanjay Mandlik
Sanjay Mandlikesakal
Updated on
Summary

'निवडणुकीत शिवसेना अत्यंत ताकदीनं लढलीय.'

KDCC Bank Election : ही निवडणूक नुरा कुस्ती नक्कीच नव्हती. कारण, लोकांनी जिल्हा बँकेसाठी भरभरून मतदान केलंय, त्यामुळं इथं नुरा कुस्तीचा विषयच येत नाही. बिनविरोधपेक्षा लोकांना मतदान करण्याची इच्छा खूप होती. त्यामुळं ९८ टक्के मतदान झालं. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) अत्यंत ताकदीनं लढलीय. आमच्याकडं साधनसामुग्री नसतानाही आम्हाला जनाधार मिळाल्यानेच आम्ही विजयी झालो, असं स्पष्ट मत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी व्यक्त केलंय. ते मतमोजणी केंद्रावर बोलत होते.

Sanjay Mandlik
माजी आमदाराच्या सुपुत्राचा मुश्रीफांच्या कट्टर कार्यकर्त्याकडून 'करेट' कार्यक्रम

खासदार मंडलिक पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांमधील दोन जागा आमच्याच असतील. 'वेट अॅण्ड वॉच, (Wait and Watch) त्यामुळं बॅंकेत आमचीच सत्ता असेल, असं सूचक वक्तव्य त्यांनी दिलंय. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि शाहूवाडीचे रणवीर गायकवाड हे आमचेच आहेत, त्यामुळं जिल्हा बँकेत शिवसेनेच्या जागा आणखी वाढणार आहेत.

Sanjay Mandlik
कसला भारी योगायोग! राज्यमंत्र्यांच्या गाडीचा नंबर 98 अन् मतंही 98

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मतदार जिल्हा बँकेत कोणाला निवडून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. जिल्हा बँक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असं त्यांनी शेवटी सांगितलं. जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवसेना पुरस्कृत पॅनेलला या निवणुकीत 6 जागा मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.