'ठाकरे कुटुंबाचं आणि महाराजांच विशेष नातं आहे'; राऊत म्हणाले...

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शाहूंचा भेट घेतली आहे.
Sanjay Raut-Shahu Mahatraj
Sanjay Raut-Shahu MahatrajSakal
Updated on

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला छत्रपतींचा आशिर्वाद घेण्यासाठी सांगितलं असं राऊत बोलताना म्हणाले आहेत.

(Sanjay Raut Meets Chhatrapati Shahu Maharaj)

दरम्यान संजय राऊत यांनी कोल्हापूरातील छत्रपतींच्या न्यू पॅलेस येथील निवासस्थानावर शाहू महाराजांची भेट घेतली. "मी छत्रपतींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे, मी इथे राजकीय गोष्टींवर बोलणार नाही" असं राऊत म्हणाले. त्याचबरोबर "छत्रपती घराण्याला कुणी चुकीची माहिती देऊ शकत नाही, छत्रपती आहेत ते." असं म्हणत त्यांनी फडणवीसांची कानउघडणी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छत्रपती घराण्याचं विशेष नातं आहे, त्यांनाही छत्रपतींना बोलायचं होतं, त्यांनीच मला आशिर्वाद घेण्यासाठी पाठवलंय." असं ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut-Shahu Mahatraj
BREAKING: मान्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रात धडकणार

"ते शिवाजी महारांजे वारसदार आहेत. महाराजांचे आशिर्वाद घेऊनच आम्ही काम करतो. त्यांना कोण चुकीची माहिती देणार, जेष्ठ आहेत ते, अशा त्यांचा अपमान करू नका." असा टोला संजय राऊतांनी केला आहे.

दरम्यान संजय राऊत सध्या पक्षाच्या संघटनात्म बांधणीच्या कामासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. राज्यसभेसाठी कोल्हापूरातून संजय पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. युवराज संभादीराजे छत्रपती यांना शिवसेनेने उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते पण त्यांच्यसमोर शिवसेनेने काही अटी घातल्या होत्या त्यानंतर संभाजी महाराजांनी राज्यसभेच्या निवडणुकांतून माघार घेतली होती.

Sanjay Raut-Shahu Mahatraj
BREAKING: मान्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रात धडकणार

"मुख्यमंत्र्यांनी आमचा शब्द पाळला नाही, त्यांनी माझा फोन उचलला नाही, मी कुणापुढे झुकून उमेदवारी घेणार नाही" असं म्हणत त्यांनी राज्यसभेतून माघार घेतली होती. त्यानंतर शिवेसेनेने राज्यसभेच्या जागेवर संजय राऊत आणि कोल्हापूरातून संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यावरून शिवसेनेवर राजकीय वर्तुळातून छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचं सांगत टीका झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.