Kolhapur : संत गाडगेबाबांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक हरपले; प्राचार्य भगत यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयावरील १०७ पुस्तकांचे भगत यांनी लेखन केले आहे.
RT Bhagat Passed Away Kolhapur
RT Bhagat Passed Away Kolhapuresakal
Updated on
Summary

‘बीए’, ‘बीएड’ व ‘एमए’ अभ्यासक्रमांसाठी त्यांच्या एकूण पाच पुस्तकांना शिवाजी विद्यापीठाने संदर्भ पुस्तके म्हणून मान्यता दिली आहे.

कोल्हापूर : निवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक आणि संत गाडगेबाबा (Sant Gadgebaba) यांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक रा. तु. भगत (वय ९१) यांचे काल (मंगळवार) निधन झाले. रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ५) सकाळी आहे. दरम्यान, श्री. भगत (RT Bhagat) हे मूळचे सांगली जिल्ह्यातील बिसूर गावचे असले, तरी त्यांची सारी कारकीर्द ही येथेच घडली. श्री. भगत यांनी अध्यापक महाविद्यालय (पुणे) व सावर्डे (चिपळूण) येथे १७ वर्षे प्राचार्य म्हणून काम केले.

RT Bhagat Passed Away Kolhapur
Udayanraje Bhosale : 'शंभूराज देसाईंची चप्पल साडेतीनशे रुपयांची, कोणी चोरली का बघा..'; असं का म्हणाले उदयनराजे?

विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयावरील १०७ पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या ‘संत गाडगे महाराज स्मारक ग्रंथ’ व ‘महात्मा जोतिराव ते कर्मवीर भाऊराव’ या पुस्तकांना अनुक्रमे महाराष्ट्र राज्य शासन व शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शिवाजी विद्यापीठात पाच वर्षे हिंदी विषयाचे पदव्युत्तर अध्यापन त्यांनी केले.

तीन वर्षे मुंबई विद्यापीठाचे सिनेटर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘बीए’, ‘बीएड’ व ‘एमए’ अभ्यासक्रमांसाठी त्यांच्या एकूण पाच पुस्तकांना शिवाजी विद्यापीठाने संदर्भ पुस्तके म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी संपादित केलेले ‘संत गाडगे महाराज गौरव ग्रंथ’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गौरव ग्रंथ’, ‘साने गुरुजी गौरव ग्रंथ’, ‘कुलगुरू बॅरिस्टर पी. जी. पाटील गौरव ग्रंथ’ महाराष्ट्रभर गाजले.

RT Bhagat Passed Away Kolhapur
Yellamma Devi : सौंदत्ती रेणुका देवीच्या चरणी भाविकांकडून भरभरुन दान; तब्बल 1 कोटी 3 लाख दानपेटीत जमा

लोकशिक्षण संस्कारमाला व बाल शिक्षण संस्कारमालेचे संपादनही त्यांनी केले. ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ या विषयावर त्यांची राज्यभरात शंभरहून अधिक व्याख्याने झाली. संत गाडगे महाराज अध्यासनाचे अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत होते.

RT Bhagat Passed Away Kolhapur
CM Siddaramaiah : 'धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा'; मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे शिफारस

आदरांजली सभा उद्या

प्राचार्य श्री. भगत यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता करवीर नगर वाचन मंदिरात आदरांजली सभा होणार आहे. या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. किसनराव कुराडे, एम. डी. देसाई, युवराज कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.