कोल्हापूर : मोदी सरकारची (PM modi government) सात वर्षे केवळ भुलभुलैय्या करण्यातच गेली असून भारताचे दरडोई उत्पन्न बांग्लादेशपेक्षाही (bangladesh) कमी झाले असल्याची टीका आज पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी पत्रकार परिषदेत केली. इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन झाल्यानंतर कॉंग्रेस समिती कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (satej patil criticized on pm modi on 7 years completed of bjp government)
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘अर्थव्यवस्थेतील काळा पैसा वसूल करणे, (ecomony, curruption) भ्रष्टाचार कमी करणे, बनावट पैसा नष्ट करणे, दहशतवाद आणि नक्षलवाद कमी करणे, अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम कमी करणे अशी उद्दिष्ट्ये सांगत कोणतीही चर्चा न करता मोदी सरकारने अचानक नोटबंदी केली गेली.पण यापैकी कोणतेही उद्दिष्ट साध्य झाले नाही. 99% पैसा बँकेत परत आला. शेतकरी कायदे पारित करताना संसदेमध्ये चर्चा करण्यात आली नाही. आज सहा महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची तयारी मोदी सरकारने दाखवलेली नाही.
पुरेशी तयारी नसताना घाईघाईने 1 जुलै २०१७ रोजी रात्री 12 वाजता संसदेत गाजावाजा करून जीएसटी आणला गेला. (entering of GST) पूर्वलक्षी प्रभावाने जीएसटी वसूल केल्याने काही उद्योग बंद पडायच्या मार्गावर आहेत. विविध जागतिक निर्देशांकात भारताचे स्थान घसरले असून कोरोनाच्या काळात (covid-19 sistuation) सपशेल अपयश आल्यानेच ते जनतेसमोर येईनासे झाले आहेत. बेरोजगारीचा दर आज मागील 30 वर्षात सर्वाधिक असून गरीब लोक अधिक गरीब होतील आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतील, अशीच धोरणे मोदी सरकारने आजवर राबवली आहेत.‘‘
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.