'किणी टोल नाका चालवण्याची थर्ड पार्टी कोणाकडं आहे, हे लवकरच सिद्ध होईल'; सतेज पाटलांचा रोख महाडिकांवर..

Kini Toll Naka Kolhapur : राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेच्या मुद्द्यावरून टोल माफीसाठी आंदोलन केले होते.
Dhananjay Mahadik vs Satej Patil
Dhananjay Mahadik vs Satej Patilesakal
Updated on
Summary

'टोल माफी आंदोलनात कार्यकर्त्यांऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता; पण त्यांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.'

कोल्हापूर : टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. टोल नाक्याची कागदपत्रे मागणी केली आहे. यावरून किणी टोल नाका (Kini Toll Naka Kolhapur) चालवण्याची थर्ड पार्टी कोणाकडे आहे, हे लवकरच सिद्ध होईल, अशी टीका आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेच्या मुद्द्यावरून टोल माफीसाठी आंदोलन केले होते. यावरून, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर दिले. आमदार पाटील म्हणाले, ‘महामार्गावर खड्डे आहेत. सेवा रस्त्यांची दुरवस्था आहे. अशावेळेला लोकांनी टोल देऊ नये, अशी आमची भूमिका असताना खासदार धनंजय महाडिक हे लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत, तर ते टोलच्याच बाजूने बोलत आहेत.

Dhananjay Mahadik vs Satej Patil
Satej Patil : 'शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे सरकारची लाडका कंत्राटदार योजना'

टोल माफी आंदोलनात कार्यकर्त्यांऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता; पण त्यांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. लोकांच्या हितासाठी आंदोलन केले, तर गुन्हे दाखल करण्याचे सरकारचे धोरण आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात तळ ठोकून असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थितीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा किमान एक दिवसाचा दौरा केला पाहिजे होता.

Dhananjay Mahadik vs Satej Patil
Sangli Politics : चंद्रहार पाटलांचा पराभव करणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

आपत्तीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली आहे. १४ दिवस झाले पाण्याची पातळी कमी होत नाही. यावर काय उपाययोजना कराव्या लागतील. मनोज जरांगे पाटील ९ ऑगस्टला कोल्हापुरात येत आहेत. सरकारने मराठा आरक्षणावर ठाम भूमिका घेतली पाहिजे. सगेसोयरे याबाबत जीआर काढण्याचा शब्द दिला होता. सरकार याचे क्रेडिट घ्यायला पुढे येत असेल, तर आरक्षणाचा प्रश्नही राज्य सरकारने मार्गी लावला पाहिजे.

‘बांगलादेशातील कोल्हापूरच्या लोकांना सुखरूप परत आणा’

बांगलादेशात कोल्हापुरातील सुमारे १५ लोक बांगलादेशात असून, ते सध्या सुखरूप आहेत. या सर्वांना राज्य सरकारने सुखरूप परत आणावे. आपणही यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.