'ही निवडणूक वेगळ्या वळणावर जाणं अपेक्षित नव्हतं.'
Rajaram Sugar Factory Election Results : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी कार्यक्षेत्रातील 58 केंद्रांवर 13 हजार 538 पैकी 12 हजार 336 (91.12 टक्के) मतदान झालं होतं.
आज मतमोजणी होती. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात सतेज पाटील यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला आहे.
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांना विजयी गुलाल लागलाय. तर, महाडिक गटानं 2821 मतांची आघाडी घेतलीये.
याच पार्श्वभूमीवर, पत्रकार परिषद घेऊन आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले, वाढीव सभासदांमुळं आमचा पराभव झाला आहे. आम्ही या पराभवाचं आत्मपरिक्षण करणार आहोत. ही निवडणूक वेगळ्या वळणावर जाणं अपेक्षित नव्हतं, असं त्यांनी सांगितलं. आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद केले, असाही त्यांनी आरोप केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.