गडहिंग्लज पंचायत समितीत तब्बल 23 लाखांचा अपहार; वरिष्ठ सहायक दयानंद पाटलांवर होणार कारवाई?

Gadhinglaj Panchayat Samiti Scam : गटशिक्षणाधिकाऱ्यांनी गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये २१ लाखांचा अपहार झाल्याचे जिल्हा परिषदेकडे कळविले होते.
Gadhinglaj Panchayat Samiti Scam
Gadhinglaj Panchayat Samiti Scamesakal
Updated on
Summary

या चौकशीमध्ये दयानंद पाटील यांनी २३ लाख ६७ हजार ९७ रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून अपहार केला असल्याचे स्पष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कोल्हापूर : गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये (Gadhinglaj Panchayat Samiti) २३ लाख ६७ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्‍ठ सहायक दयानंद पाटील यांनी शासकीय निधी स्वत:च्या बँक खात्यावर (Bank Account) वर्ग केल्याचे निदर्शनास आले आहे. द्विसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये २१ लाखांचा अपहार झाल्याचे जिल्हा परिषदेकडे कळविले होते. या प्रकरणात शिक्षण विभागाकडील वरिष्ठ सहायक दयानंद पाटील यांनी हा अपहार केल्याचे नमूद केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उपमुख्य लेखा वित्त अधिकारी अरुण हजबे आणि उपशिक्षणाधिकारी टोणपे यांची द्विसदस्यीय समिती गठित करून १० सप्टेंबरपूर्वी हा अहवाल जिल्हा परिषदेकडे देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Gadhinglaj Panchayat Samiti Scam
भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

या चौकशीमध्ये दयानंद पाटील यांनी २३ लाख ६७ हजार ९७ रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून अपहार केला असल्याचे स्पष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, हा अपहार लक्षात आल्यानंतर दयानंद पाटील यांना यापूर्वीच निलंबित केले होते. या अपहारात २०१९-२० मध्ये ३ लाख ९३ हजार ७८० रुपये, २०२०-२१ मध्ये ४ लाख १३ हजार ६३ रुपये, २०२१-२२ मध्ये ३ लाख ९३ हजार ६२५ रुपये, २०२२-२३ मध्ये ४ लाख ९० हजार ५०० रुपये, तर २०२३-२४ मध्ये ४ लाख ७८ हजार ५०० असा एकूण २३ लाख ६७ हजार ९७ रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे.

ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२० या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव होता. या काळात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मूळ पगार, घरभाडे, महागाई भत्ता गरजेपेक्षा जास्त जमा झाले होते. जादा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ही रक्कम संबंधित खात्यावर नसून, त्या रकमेचा अपहार झाल्याचे लक्षात आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. यामध्ये वरिष्ठ सहायक, तीन विस्तार अधिकारी, तीन परिचर यांच्या नावावरही जास्त रक्कम गेल्याचे दिसत आहे. यातील सुमारे २० लाख रुपयांची सर्वाधिक रक्कम दयानंद पाटील यांच्या नावावर आहे, तर उर्वरित दोन लाख विस्तार अधिकारी, एक महिला विस्तार अधिकारी, एक शिपाई, एक महिला परिचर यांच्या नावावर आहे.

Gadhinglaj Panchayat Samiti Scam
मुस्लिमांबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचं वादग्रस्त विधान; Supreme Court कडून स्वेच्छेने खटला दाखल, असं काय म्हटलं होतं?

गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये २३ लाख ६७ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा अहवालही मिळाला आहे. त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

-कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.