Indian Army : गवंड्याच्या पोराची भारतीय सैन्य दलात निवड; गणेशने दुसऱ्याच प्रयत्नात मिळवली Army 'वर्दी'

गणेशने दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. Indian Army Agniveer Ganesh Sanjay Madhale
Ganesh Sanjay Madhale Indian Army Agniveer
Ganesh Sanjay Madhale Indian Army Agniveeresakal
Updated on

बेनाडी (बेळगांव) : आडी (ता. निपाणी, जि. बेळगांव) येथील अतिशय सामान्य कुटुंबातील गणेश संजय मधाळे याची भारतीय सैन्य दलात (Indian Army Agniveer) नुकतीच निवड झाली आहे. गणेशने दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे.

Ganesh Sanjay Madhale Indian Army Agniveer
Indian Army Agniveer Recruitment 2024: अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू, महत्त्वाच्या अटी अन् अर्ज कसा भरायाचा जाणून घ्या...

गेली दोन-तीन वर्षे गणेशला (Ganesh Sanjay Madhale) सैन्य भरती प्रक्रियेत अपयश येत होतं, पण मनात 'फौजी' होण्याचं स्वप्न स्वस्त बसू देत नव्हतं. गणेश नियमित पहाटे 5 वाजता व्यायामला (रनिंग) जायचा, त्याला काही करुन सैन्यात भरती (Military Recruitment) व्हायचं होतं, त्यानं सैन्य भरतीचं स्वप्न उराशी बाळगलं होतं, त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरु होते. आजअखेर त्यांचं सैन्य भरतीचं स्वप्न पूर्णात्वाला आलं आहे. त्याची जिद्द, मेहनत फळाला आली आहे.

Ganesh Sanjay Madhale Indian Army Agniveer
Indian Army: भारतीय लष्कराने बदलले फिटनेसचे नियम; सुधारणा न झाल्यास सुट्ट्या होणार कमी?

'गणेशच्या निवडीचा सार्थ अभिमान'

गणेशचे वडील गवंडी काम करतात, तर आई मोलमजुरी करते. गणेशचं प्राथमिक शिक्षण उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा आडी या ठिकाणी झालं, तर पुढील शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा इथं झालं. तसेच देवचंद महाविद्यालयातून (Devchand College Arjunnagar, Nipani) त्यानं B.com मधून पदवी घेतली आहे. गणेशच्या या कामगिरीबद्दल आडीसह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आम्हा सर्वांना गणेशच्या या निवडीचा सार्थ अभिमान असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय.

गणेशच्या सैन्य दलातील निवडीने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. गणेशला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही, त्यानं यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आज माझ्या मुलाच्या निवडीनं ऊर अभिमानानं भरुन आला आहे.

-संजय मधाळे (गणेशचे वडील)

Ganesh Sanjay Madhale Indian Army Agniveer
Indian Army Day 2024 : बारावीनंतर सैन्यात कोणकोणत्या पदांसाठी भरती होता येईल? जाणून घ्या

माझ्या आई-वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की, मी सैन्य दलात नोकरी करून देश सेवा करावी. आई-वडिलांचं स्वप्न आज खरे ठरलेले आहे. मला मोठं करण्यात गुरुजनांचा, ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच सैन्य दलात जाण्याचा विचार केल्यानंतर अविरत शारीरिक कसरत, परिश्रम व सातत्यपूर्ण सराव, यामुळंच मला यश मिळालं आहे. तसेच सुमित कदम सरांचा देखील माझ्या यशात मोलाचा वाटा आहे.

-गणेश मधाळे, आडी (ता. निपाणी, जि. बेळगांव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()