होगाडे उच्चशिक्षित होते. डी. एम. ई., बी. ई. (मेकॅनिकल) असे त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे शहरातील विविध संस्थांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान होते.
इचलकरंजी : वीजतज्ज्ञ अशी संपू्र्ण महाराष्ट्राला ओळख असणारे आणि पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते व अभियंते प्रताप गणपतराव होगाडे (वय ७४) यांचे काल सकाळी घरात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते (Pratap Hogade Passed Away) समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्षही होते. त्यांच्या निधनामुळे वीज क्षेत्रातील चळवळीची मोठी हानी झाली आहे. येथील दाते मळ्यातील त्यांच्या निवासस्थानापासून आज (ता. १९) सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.