'सुरत लुटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी 100 कोटी होन आणले'; काय म्हणाले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांनी १६६४ व १६७० ला सुरतेची लूट केली. जे महत्त्व मुंबईला आज आहे, त्या काळात सुरतेला होते.
Dr. Jaysingrao Pawar
Dr. Jaysingrao Pawaresakal
Updated on
Summary

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माईकसमोर आल्यानंतर सुरत लुटली की नाही, असा प्रश्‍न पवार यांच्यासमोर उपस्थित केला.

कोल्हापूर : इतिहासकारांनी राजकारणात पडू नये आणि राजकारण्यांनी इतिहासात ढवळाढवळ करू नये, असे परखड मत व्यक्त करत छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) दोन वेळा सुरतेची लूट केल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (Dr. Jaysingrao Pawar) यांनी येथे सांगितले. इंग्लंडच्या वृत्तपत्रात ज्या लुटीची बातमी छापून आली, ती लूट नसल्याचे धडधडीत खोटे कशासाठी बोलता?, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. निमित्त होते आनंदभवन बहुद्देशीय सभागृहाच्या उद् घाटनाचे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.