सांडपाणी पुन्हा रंकाळ्यात ;  पाण्याबरोबर जैवविविधतेलाही धोका 

Sewage re-sinks; Threats to biodiversity along with water
Sewage re-sinks; Threats to biodiversity along with water
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळा तलाव विविध कारणांनी पुढे आला आहे आणि रंकाळ्याच्या संवर्धनासाठी अनेक संघटनांनी आंदोलनेही केली आहेत. त्यामुळे रंकाळ्याचे अस्तित्व अजूही अबाधित आहे. परंतु जुना वाशी नाका सानेगुरुजी परिसरातील सर्व सांडपाणी हे थेट रंकाळ्यात मिसळते, त्यामुळे रंकाळ्यातील पाण्याला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. 

देशभरातील पर्यटक कोल्हापुरात आल्यानंतर अंबाबाई, जोतिबाचं दर्शन घेतल्यानंतर रंकाळ्याला पसंती देतात. तांबट कमान ते जुना वाशी नाका या परिसरातील तलावात सांडपाणी मिसळत आहे. या परिसरात शेकाट्या पक्षांचे आगमन झाले आहे. शेकाट्या पक्षी ज्या ठिकाणी वास्तव्य असते तिथे मुख्यतः त्या पाण्यात ऑक्‍सीजन कमी झालेला असतो, अशा पाण्यात किटक निर्माण होतात. हे किटक शेकाट्या पक्षांचे भक्ष असते. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात रंकाळ्याच्या काही भागात शेकाट्या दिसत आहेत. हे पक्षी म्हणजे दुषित पाण्याचे दिशादर्शक म्हटले जाते. परिणामी रंकाळ्याचे प्रदुषण वाढले असून तलावातील प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेला सांडपाणी रोखावे लागणार आहे. 

रंकाळा तलावात सांडपाणी आणि मैलायुक्त पाणी प्रक्रियेविना मिसळते. त्याचा परिणाम म्हणून तलावाचे युट्रोफिकेशन म्हणजेच पाण्यातील नत्राची उपल्ब्धता अमर्याद वाढली आहे. तलावाच्या पूर्व-दक्षिण भागात जलपर्णी, केंदाळ, पाणकणीस यासारख्या वनस्पतींची वाढ झाली आहे. तलावाचा पुष्ठभाग या वनस्पतींनी झाकल्यामुळे पाण्यातील ऑक्‍सीजनची पातळी कमी झाली आहे. 
- प्रा.विनायक साळुंखे, सहाय्यक प्राध्यापक, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ. 


रंकाळा टिकवण्यासाठी आम्ही याआधी महापालिका, प्रदुषण नियत्रंण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु उच्च न्यायालय व हरित लवाद यांनी आदेश देवून मार्गदर्शक तत्वेही घालून दिली असताना याकडे पूर्णतः प्रशासन कानाडोळा करत आहे. 
-दिलीप देसाई, प्रजासत्ताक संस्था.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.