Kolhapur : खासदार शाहू महाराज व माने यांची मराठीतून शपथ

कोल्हापूरचे नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत मराठीतून शपथ घेतली. शाहू महाराज पहिल्यांदाच, तर माने दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचले आहेत.
Kolhapur
Kolhapur sakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरचे नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत मराठीतून शपथ घेतली. शाहू महाराज पहिल्यांदाच, तर माने दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि त्यात दीड लाख मतांनी विजय मिळवला. खासदार माने हे हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाले आहेत, त्याची खासदारकीची ही दुसरी टर्म आहे. कालपासून (ता. २४) संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनातील पहिले दोन दिवस नव्या सदस्यांचा शपथविधी सुरू आहे. त्यात आज खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व धैर्यशील माने यांचा शपथविधी होता. या दोघांनीही मराठीतून शपथ घेतली.

Kolhapur
Kolhapur News : शेंडापार्कातील २० एकरवर ‘टेक्निकल पार्क’,राजेश क्षीरसागर : शाश्‍वत विकास परिषद जिल्ह्याचा जीडीपी वाढवेल,मुश्रीफ

शपथविधी सोहळ्यावेळी प्रेक्षक गॅलरीत खासदार शाहू महाराज यांच्या पत्नी सौ. याज्ञसेनी छत्रपती, सुपुत्र माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, स्नुषा संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, नातू शहाजीराजे, यशराजराजे व यशस्वीनी राजे, बंधू संग्रामसिंह भोसले, तर खासदार माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने, पत्नी वेदांतिका, बंधू सत्त्वशील माने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.