Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ महामार्ग रद्द करा'; खासदार शाहू महाराज, सतेज पाटलांचा सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम

Shaktipeeth Highway : राज्य सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णयांचा धडाका लावला आहे.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayesakal
Updated on
Summary

‘सर्व पक्षीयांनीच शक्तिपीठ महामार्ग नको असे सांगितले आहे. असे असताना राज्य सरकार महामार्ग रद्द करण्याचा निर्णय का घेत नाही?'

कोल्हापूर : ‘राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाची (Shaktipeeth Highway) अधिसूचना परत घेऊन तो रद्द केल्याची अधिकृत घोषणा येत्या ४८ तासांत करावी’, अशी मागणी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. तसेच सोमवारी (ता. २१) दुपारी १२ वाजता कोल्हापुरात १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती निमंत्रक गिरीश फोंडे यांनी दिली.

Shaktipeeth Highway
सांगलीच्या जागेसाठी 'या' दोन नेत्यांत रस्सीखेच; विश्वजित कदम, विशाल पाटलांकडे कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) म्हणाले, ‘सर्व पक्षीयांनीच शक्तिपीठ महामार्ग नको असे सांगितले आहे. असे असताना राज्य सरकार महामार्ग रद्द करण्याचा निर्णय का घेत नाही? हा प्रश्‍न आहे. महामार्ग रद्द होण्यासाठी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे १२ जिल्ह्यांतील निर्धार परिषद सोमवारी घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी म्हणजे येत्या ४८ तासांत महामार्ग रद्दचा निर्णय सरकारने घ्यावा.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘राज्य सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णयांचा धडाका लावला आहे. परंतु शक्तिपीठ महामार्गाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. सरकारने महामार्गासाठी काढलेली अधिसूचना परत घ्यावी. तसेच महामार्ग रद्द झाल्याची स्पष्टपणे घोषणा करावी. दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. सरकारने लाडक्या कंत्राटदारांचे लाड करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे हित बघावे.’

गिरीश फोंडे म्हणाले, ‘१२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध टीम तयार करून महायुती सरकारच्या आमदारांच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे. या जिल्ह्यातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी शक्तिपीठ महामार्गविरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी हा महामार्ग रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांसोबत रहावे, अशी अपेक्षा आहे.’ यावेळी शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, शिवाजी कांबळे, आनंदा देसाई, जालिंदर कुडाळकर, तानाजी भोसले आदी उपस्थित होते.

Shaktipeeth Highway
'खालच्या दर्जाची वक्तव्ये करून मुश्रीफांनी शाहू महाराज, आंबेडकरांचा अपमान केलाय'; समरजित घाटगेंचा निशाणा

परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण

परिषदेमध्ये शक्तिपीठ महामार्ग विरोधात भूमिका न घेणाऱ्या महायुतीच्या सर्व आमदारांना पराभूत करण्याचा ठराव होणार आहे. यावेळी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत, राजाराम सिंह, कृषी अभ्यासक योगेंद्र यादव यांच्यासह खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच परिषदेसाठी खासदार शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.