कोल्हापूर : पुरात उद्ध्वस्त झालेले सावर्डीकर सावरताहेत!

कधी नव्हे ते यंदा पुराची भीषणता अनुभवलेल्या गावकऱ्यांनी पुन्हा आनंदाने जगण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर : पुरात उद्ध्वस्त झालेले सावर्डीकर सावरताहेत!
Updated on

कोल्हापूर : यंदाच्या अतिवृष्टीत अचानक पुराने (shahuwadi, sawardi village) कोलमडलेले शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गाव आता सावरू लागलं आहे. घरादाराची स्वच्छता करून ही कुटुंबे पुन्हा घरात राहायला आली असून, गावातल्या विद्यामंदिरात चार-पाच कुटुंबे राहत आहेत. (flood) घरे कोसळलेल्या कुटुंबांनी मात्र शेजारच्या इजुली गावातील नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. कधी नव्हे ते यंदा पुराची भीषणता अनुभवलेल्या गावकऱ्यांनी पुन्हा आनंदाने जगण्यास सुरुवात केली आहे.

करंजफेणपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर पाल गाव असून, ते यंदा नव्या पुलाने जोडले गेले आहे. जुन्या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी तो पूल पुरात पाण्याखाली जायचा. त्यावेळी गावाशी संपर्क तुटायचा. यंदा नव्याने बांधलेल्या पुलाची उंची जुन्या पुलाच्या चौपट वाढवूनही पुराचे पाणी गावात शिरले. पाल गावापुढे डोंगरकुशीत वसलेल्या सावर्डी गावाला फटका बसला. गावातील सुमारे बारा घरे पुरामुळे कोसळली असून, त्या कुटुंबांची अक्षरश: वाताहत झाली. पाहुण्यांकडे ती राहायला गेली आहेत.

कोल्हापूर : पुरात उद्ध्वस्त झालेले सावर्डीकर सावरताहेत!
लाचलुचपतची धडक कारवाई; लेखाधिकारी कार्यालयातील दोघेजण जाळ्यात

उर्वरित कुटुंबांनी घराची स्वच्छता केली असून, जगण्याची नवी लढाई त्यांची सुरू झाली आहे. गावातले रेशनधान्य दुकान पुरात बुडाल्याने धान्याचे नुकसान झाले आहे. जीवनावश्यक साहित्यासाठी त्यांना करंजफेण बाजारपेठेत जावे लागत आहे. पालक ते सावर्डी गावा दरम्यानच्या वळणाच्या रस्त्यावर डोंगरावरील माती पसरली होती. रस्ता चिखलमय झाला होता. या गावाशी संपर्क तुटला होता. रस्त्यावरील माती बाजूला सारल्याने पुन्हा विविध संस्था मदत करण्यासाठी गावाला भेट देत आहेत.

"गावात पुराचे पाणी शिरेल, असे वाटत नव्हते. त्या दिवशी रात्री अचानक दहा वाजता पुराचे पाणी थेट रेशन धान्य दुकानात शिरले. पोती काढायलाही वेळ मिळाला नाही. जनावरे बुडायला नकोत म्हणून ती तत्काळ डोंगरावर नेण्यात आली. आता आम्ही गावात राहायला आलो आहोत."

- भारती राजाराम पाटील (रहिवासी, सावर्डी)

कोल्हापूर : पुरात उद्ध्वस्त झालेले सावर्डीकर सावरताहेत!
जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांचे बिगुल सप्टेंबरमध्ये वाजणार?

"गावकऱ्यांची पिके पुरात बुडाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या गावकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने होऊन, त्यांना तत्काळ मदत मिळणे आवश्यक आहे."

- डॉ. मंगेश पाटील (सचिव, अरण्यानंद प्रतिष्ठान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()