Sharad Pawar On Surat Loot: "एकदा नाही दोनदा..." शिवरायांच्या सुरत लुटीवर शरद पवारांचे फडणवीसांना उत्तर

Sharad Pawar On Surat Loot: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मविआ'वर टीका करत, "काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा खोटा इतिहास शिकवला," असे म्हटले होते.
Sharad Pawar On Surat Loot
Sharad Pawar On Surat LootEsakal
Updated on

राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील वातावरण पेटले आहे. गेल्या रविवारी महाविकास आघाडीने या विरोधात जोडे मारो आंदोलन केले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मविआ'वर टीका करत, "काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा खोटा इतिहास शिकवला," असे म्हटले होते.

दरम्यान फडणवीस यांच्या टिकेबाबत आज कोल्हापूरात माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांना सुरत लुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरद पवार म्हणाले, "शिवरायांनी एकदा नाही तर दोनदा सुरत लुटली असे अनेक इतिहाकार सांगतात. पण सुरतवर स्वारी करण्यामागे महाराजांचा उद्देश वेगळा होता."

काय म्हणाले पवार?

कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, "दुर्दैवाने वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वेगळे विधान केले. ते म्हणाले होते की, शिवरायांनी सुरत लुटीचे काम केले नव्हते आणि काँग्रेसने खोटा इतिहास शिकवला आहे. पण, अशा विषयावर बोलण्याचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला आहे, याविषयी लिहिले आहे. त्यामुळेच इतिहासकार जयसिंगराव पवारांनी स्वच्छपणे सांगितले आहे की, शिवरायांनी एकदा नव्हे तर दोनदा सुरत लुटली होती आणि या सुरत स्वारीमागे त्यांचा उद्देश वेगळा होता."

Sharad Pawar On Surat Loot
ST Worker Samp Swargate: पुण्याहून एसटी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, स्वारगेटवरून धावताहेत फक्त 'इतक्या' गाड्या

दरम्यान शरद पवार यांचा कालपासून चार दिवसांचा कोल्हापूर दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध नेत्यांची भेट घेतली. त्याचबरोबर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करत त्याच्या बांधकामासाठी त्यांच्या फंडातून एक कोटी रुपयांचा निधीही दिला.

पुढे काल सध्याकाळी कागलच्या गैबी चौकात भाजपच्या समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. घाटगे यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे तर राष्ट्रवादीची कोल्हापूरात असलेली ताकद आणखी वाढली आहे.

समरजीत घाटगे यांच्या पक्षप्रवेशावेळी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी कागलकरांना अवाहन केले की, "तुम्ही समरजीत घाटगेंना आमदार केल्यास त्यांना पुढे मोठी संधी देण्याचे काम करू."

यावेळी पवारांनी राजकोट दुर्घटना, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मुद्द्यांवरही आपली मते मांडली.

Sharad Pawar On Surat Loot
ST E-Ticket Refund: एसटी संपामुळे ई-तिकीट रद्द केल्यास पैसे परत मिळणार का? वाचा काय आहे नियम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.