CM शिंदेंच्या 'या' उपक्रमामुळं एसटीच्या 150 फेऱ्या रद्द; स्थानिक प्रवाशांना मोठा फटका

एसटीच्या जवळपास १५० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला.
ST Bus
ST Busesakal
Updated on
Summary

शासन आपल्या दारी उपक्रमासाठी कोल्हापूर, तसेच अन्य जिल्ह्यांतून ३७० बस आणल्या होत्या. सर्व लाभार्थी प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी सोडले आहे.

कोल्हापूर : शासन आपल्या दारी उपक्रमासाठी (Shasan Aplya Dari Yojana) एसटी महामंडळाने ७१६ बस गाड्यांची सेवा दिली. यात जिल्ह्यातील ३५० बस वापरल्या. उर्वरित बस परजिल्ह्यांतून आणल्या. त्यामुळे अवघ्या दीडशे बसमधून जिल्ह्यातील नेहमीची प्रवासी सेवा देणे मुश्कील झाले. याचा फटका स्थानिक प्रवाशांना बसला.

एसटीच्या जवळपास १५० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला, तर काहींनी खासगी प्रवासी वाहतुकीचा (ST Corporation) आधार घेतला, तर अनेकांनी आजचा प्रवासच रद्द केला. सांगली, रत्नागिरी, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा येथून प्रत्येकी ५० ते ७० बस मागविल्या होत्या.

ST Bus
Satara : छ. शिवाजी महाराज पुतळा परिसरात काही करण्याचं धाडस करू नका; पालकमंत्र्यांना स्पष्ट इशारा

त्या काल सकाळी सहापासून विविध गावांतील शासकीय योजनांचे लाभार्थी घेऊन तपोवन मैदानावर आल्या. दुपारी बाराला बस दाखल झाल्या. लाभार्थींना सोडल्यानंतर बस थांबून होत्या. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाल्यानंतर बस लाभार्थींना गावी सोडण्यासाठी रवाना झाल्या. या बस रात्री जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महत्त्वाच्या गावांकडे लाभार्थींना घेऊन गेल्या. आज (ता. १४) सकाळी सहापासून नियमित प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

ST Bus
Eknath Shinde : 'त्या' जाहिरातीवरुन वाद पेटणार? CM शिंदे म्हणाले, फडणवीस आणि आमच्यात कोणतेही मतभेद..

शासन आपल्या दारी उपक्रमासाठी कोल्हापूर, तसेच अन्य जिल्ह्यांतून ३७० बस आणल्या होत्या. सर्व लाभार्थी प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी सोडले आहे. आजपासून सर्व बस नियमित प्रवासी सेवेत दाखल होतील. जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी बस धावल्या आहेत. मात्र कमी प्रवासी प्रतिसाद असलेल्या ठिकाणी काही अंशी गैरसोय होऊ शकते.

- एस. बी. बोगरे, एसटी विभागीय वाहतूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.