Shirala Morna Dam Water Storage : शिराळ्यातील मोरणा धरण भरले; चांदोलीत ६०.५० टक्के पाणीसाठा

shirala Water Storage : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी उघडीप दिली. शिराळा शहरानजीक असलेले मोरणा धरण आज रात्री १०० टक्के भरले.
Shirala Morna Dam Water Storage
Shirala Morna Dam Water Storage Sakal
Updated on

पुनवत : शिराळा तालुक्यात सोमवारपासून (ता. १५) पावसाचा जोर कमी झाला आहे. आज दिवसभर उघडीप होती. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी उघडीप दिली. शिराळा शहरानजीक असलेले मोरणा धरण आज रात्री १०० टक्के भरले. तसेच याआधी करमजाई, अंत्री बुद्रुक हे तलाव १०० टक्के भरले आहेत.

पश्चिम भागातील भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. कुसाईवाडीपैकी दुरंदेवाडी-हुंबरवाडी ओढ्याने मार्ग बदलल्याने रस्ता तुटल्याने हुंबरवाडीचा संपर्क तुटला आहे चांदोली धरणात आज दुपारी चार वाजता २०.८२, एकूण तर १३.९४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

धरण ६०.५० टक्के भरले आहे. शनिवारी (१३) रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. चांदोली धरणातून १००० क्युसेकने पाणी धरणातून नदीपत्रामध्ये सोडण्यात येत असून ९ हजार २२० क्युसेकने पाण्याची आवक होत आहे.

वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली आहे. समतानगर पूल, येळापूर-वाकुर्डे पूल पाण्याखाली गेले होते, ते खुले झाले आहेत. तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार, शनिवारी झालेल्या पावसामुळे धरण, पाझर तलाव, मध्यम प्रकल्प यातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

मंडलनिहाय पडलेला पाऊस

  • चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात - १ मिलिमीटर (एकूण ११८४ मिमी)

  • निवळे - १० मिलिमीटर (एकूण २११६ मिलिमीटर)

  • धनगरवाडा - ३ मिलिमीटर (एकूण ११४४ मिलिमीटर)

  • कोकरूड - ० ( ३५७.६०), शिराळा -००.५० ( ३७०.००)

  • शिरशी - ० (४०८.२०), मांगले - ० ( ५१५.३०)

  • सागाव- ०.८० (४३१.४०), चरण - २.३० (९५४.६०)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.