साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी केल्यास गुन्हे दाखल करा, शिरटी ग्रामपंचायतीचा निर्णय
Sugarcane For Sugar Factory: गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० व यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाचा ॲडव्हान्स दर निश्चित झाल्याशिवाय शिरटी (ता शिरोळ) या गावातील ग्रामस्थांनी ऊस तोड घेऊ नयेत. तसेच कोणत्याही साखर कारखान्याने जर ऊसतोड जबरदस्तीने सुरू केली, तर त्या कारखान्याच्या चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा एकमुखी ठराव शिरटी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला.
तसेच मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देऊन लवकरात लवकर निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य राजीनामा देतील, असाही ठराव सभेत केला असल्याची माहिती माजी सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी दिली. ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच हसीना मुलांनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.