Shiv Sena : ..तर कोल्हापूरच काय, देश सोडून जातो; शिवसेना नेत्याचं राजेश क्षीरसागरांना ओपन चॅलेंज

'खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.'
Ravikiran Ingawale vs Rajesh Kshirsagar
Ravikiran Ingawale vs Rajesh Kshirsagaresakal
Updated on
Summary

'खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.'

कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठा गदारोळ पहायला मिळत आहे. शिंदे गट-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. कोल्हापुरातही (Kolhapur) शिंदे विरुध्द ठाकरे असाच काहीसा सामना रंगताना दिसत आहे. दरम्यान, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर इंगवले भलतेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

इंगवलेंनी माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनाच आव्हान दिलं आहे. राजेश क्षीरसागर यांनी मी गणपती मिरवणुकीत विनयभंग केल्याचं सिध्द केल्यास कोल्हापूरचं काय देश सोडून जातो. परंतु, त्यांनी पुरूषार्थ असेल तर स्वत: तक्रार करायला हवी होती. महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये, असं आव्हान शिवसेनेचे शहरप्रमुख रवि इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केलं.

Ravikiran Ingawale vs Rajesh Kshirsagar
Kolhapur : शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग; ठाकरे गटाच्या शहर प्रमुखासह 40 जणांवर गुन्हा

अनंत चतुर्दशीदिवशी शिंदे समर्थक असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या बूथसमोर इंगवले यांच्या फिरंगाई तालमीची मिरवणूक आली असता, त्यांनी बूथवरील महिलांकडं पाहून अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्याप्रकरणी इंगवले यांनी आपली बाजू मांडली. इंगवले म्हणाले, सुदैवानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्याच बूथवरून पूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण केले आहे. जर यात मी दोषी असेन तर देश सोडून जातो. परंतु, खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत मातोश्री इंगवले यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.

Ravikiran Ingawale vs Rajesh Kshirsagar
पंजाबच्या राजकारणातून मोठी बातमी; कॅप्टन अमरिंदर सिंग 19 सप्टेंबरला त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.