Kolhapur : पराभवाच्या भीतीनं 'त्यांच्या' पायाखालची वाळू सरकलीये; शिवसेना नेत्याचं सतेज पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे. इथे काही अघटित घडणार नाही.
Satej Patil Rajesh Kshirsagar Kolhapur
Satej Patil Rajesh Kshirsagar Kolhapur esakal
Updated on
Summary

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

कोल्हापूर : ‘महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी आजपर्यंत विशिष्ट समाजाचे लांगूनचालन केले. त्यामुळे त्यांना अघटित घडेल, असे वाटते. आगामी निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

त्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत,’ अशा शब्दांत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला. जिल्ह्यात काही अघटित घटना घडण्याची शक्यता आहे, असे विधान आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले होते.

Satej Patil Rajesh Kshirsagar Kolhapur
Kolhapur : येत्या तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवलं जाण्याची शंका; सतेज पाटलांनी व्यक्त केली भीती

त्याला प्रत्युत्तर देताना राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) म्हणाले, ‘महाविकास आघाडीतील पक्षांनी नेहमीच विशिष्ट समाजाचे लांगूनचालन केले. त्यामुळे त्यांना काही तरी अघटित घडेल असे वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा सुव्यवस्था सांभळण्यास सक्षम आहेत.

Satej Patil Rajesh Kshirsagar Kolhapur
Kolhapur : ठरलं! लोकसभेसाठी कोल्हापुरातून 'हा' तगडा उमेदवार उतरणार रिंगणात; NCP च्या बैठकीत एकमत

कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे. इथे काही अघटित घडणार नाही. राज्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युतीचे सरकार आले आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक आहे. या सर्व निवडणुकांमध्ये युतीचा विजय होणार, हे स्पष्ट दिसते. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून ते अशाप्रकारची विधाने करत आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()