कोल्हापूर
दीक्षांत समारंभाचा पोशाख, सत्काराच्या शालीचा रंग बदलणार; शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून समिती स्थापन
Shivaji University Convocation Ceremony : विविध ६७ विषयांवर चर्चा झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर सचिवपदी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.
Summary
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाची सुधारित नियमावली, विद्यापीठ परिसरामध्ये वृक्षलागवड करण्यास आणि विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना मुदतवाढ देण्यात आली.
सातारा : दीक्षांत समारंभाचा (Convocation Ceremony) पोशाख आणि विविध कार्यक्रमांत प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारावेळी त्यांना दिल्या जाणाऱ्या शालीचा रंग, आकार बदलण्यासाठी नवीन समितीचे गठण शिवाजी विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आले. विधी (लॉ), अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरिऑनची सवलत देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.