शिवकालीन होन जीवापाड जपणारे कुटुंब

औकिरकरांचे रायगडावर झोपडीत वास्तव्य; जगण्याचा संघर्ष सुरूच
शिवकालीन होन जीवापाड जपणारे कुटुंब
Updated on

रायगड : वंशपरंपरेने मिळालेल्या ‘शिवकालीन होन’ची (सुवर्ण नाणे) जपणूक करणारे गडावरील औकिरकर कुटुंब पूर्वजांच्या इतिहासाचा अभिमान बाळगत आजही स्वाभिमानाची लढाई लढत आहे. पोटापाण्यासाठी लिंबू सरबत, ताक विकण्यासह मोलमजुरीचे काम यांच्या पाचवीलाच पुजले आहे. त्यांची पाचवी पिढी गडावरील साध्या झोपडीत राहते. औकिरकर कुटुंबात बारा सदस्य आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आज त्यांचा सन्मान करणार आहेत. विठ्ठल धाकटू औकिरकर वयाच्या एकाहत्तरीत, तर त्यांच्या पत्नी निर्मला औकिरकर सहासष्टीत आहेत. विठ्ठल औकिरकर यांच्या पणजी गंगूबाई भागू औकिरकर यांची हिरकणीवाडी येथे गवताची झोपडी होती. ती पेटल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती. त्या वेळी गडावरील त्या कोंडखळीच्या गुहेत राहायला आल्या. या गुहेत त्यांनी गायी पाळल्या होत्या.

शिवकालीन होन जीवापाड जपणारे कुटुंब
अल्टिमेटम संपला, रायगडावरुन संभाजीराजेंनी दिली आंदोलनाची हाक

पर्यटकांना ताक, लिंबू सरबत विकून त्यांनी चरितार्थ सुरू ठेवला. त्यांचा मुलगा शामा व नातू धाकटू व धोंडू यांच्यासह धाकटू यांचा मुलगा विठ्ठल औकिरकर यांचा जन्म गुहेतला. काही वर्षांनंतर औकिरकर कुटुंबाने गुहेच्या वरच्या बाजूला छोटी झोपडी बांधली. पुढे याच झोपडीत त्यांच्या पिढ्या राहिल्या.

विठ्ठल औकिरकर यांना बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. ताक, लिंबू सरबत विक्री हाच उत्पन्नाचा मार्ग होता. ते मोल-मजुरीची कामेही करायचे. पत्नी निर्मला गडावर पर्यटकांना लिंबू सरबत विकायच्या. पुढे मुलगी निलम, वंदना, मुलगा संजय व सून सुषमा यांनी हेच काम सुरू ठेवले. आजही सर्व जण गडावर याच कामात आहेत. गडावरची पहिली झोपडी औकिरकर कुटुंबीयांची. पावसाळ्यात हे कुटुंब गडावरच राहते. गडावरच्या मुसळधार पावसात घराबाहेर पडणे मुश्कील असते. पावसाळ्यातील चार महिन्यांचा बाजार हे कुटुंब आधीच भरून ठेवते. पर्यटकांची आपुलकीने काळजी घेणारे म्हणून ते गडावर ओळखले जातात.

"वंश परंपरेने नाणे आमच्या घरी होते. ते होन आहे, याची कल्पना नव्हती. कोल्हापुरातील सह्याद्री प्रतिष्ठानचे संदीप खांडेकर, प्रवीण हुबाळे यांच्याकडून ते नाणे होन असल्याचे समजले. अनेक वर्षे खासदार संभाजीराजे रायगडाच्या विकासाचे काम करत आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्याकडे होन देण्याचा निर्णय घेतला."

- निलम औकिरकर

शिवकालीन होन जीवापाड जपणारे कुटुंब
..तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही

"आमच्याकडे ताम्रपट होता. त्याचे महत्त्व आमच्या आजोबा-पणजोबाला माहीत नव्हते. त्यांनी तो मोडीत घातला. ते, एक नाणे पूजत होते. ती परंपरा आम्ही पुढे सुरू ठेवली. आमच्या पूर्वजांपासून ते आमच्याकडे आहे, एवढेच आम्हाला माहीत होते."

- विठ्ठल औकिरकर

"रायगडावरील टांकसाळीत ‘होन’ पाडण्यात येत होते. होन आज दुर्मिळ आहे. तो मिळणे केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशवासीयांसाठी भाग्याची बाब आहे."

- गिरीश जाधव, ज्येष्ठ शस्त्र संग्राहक

याच होनाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा

औकिरकर कुटुंबीय हा होन खासदार संभाजीराजे यांच्याकडे उद्या (ता. ६) सुपूर्द करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी गडावरील टांकसाळीत ‘होन’ पाडण्यात आला होता. त्या होनाने राज्याभिषेकही झाला होता, असे इतिहास अभ्यासक सांगतात. तब्बल ३४७ वर्षांनंतर मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुर्मिळ होनाने राज्याभिषेक होणार आहे.

शिवकालीन होन जीवापाड जपणारे कुटुंब
Farm Bills 2020: उस्मानाबादेत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

असा आहे होन...

या होनवर बिंदुमय वर्तुळात पुढील बाजूला तीन ओळींत ‘श्री/राजा/शिव’, तर मागील बाजूला दोन ओळींत ‘छत्र/पति’ असे अंकित केले आहे. नाण्याचा आकार वाटोळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.