या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गारगोटीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गारगोटी : शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आबिटकर यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत अनेक आरोप करण्यात आले. येथील हुतात्मा चौकात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार आबिटकरांविरोधात घोषणा देत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आबिटकरांवर जोरदार टीका केली. गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांनी स्वगृही परतावे. अन्यथा गद्दार आमदारांना जनताच धडा शिकवेल असा इशारा दिला. शिवसेनाप्रमुखांशी केलेल्या गद्दारीविरोधात यापुढेही पदाधिकारी, कार्यकर्ते बंडखोर आमदारांच्याविरोधात सर्वत्र रस्त्यावर उतरतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गारगोटीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्ते आमदार आबिटकर यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले. यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनात तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, रंजना आंबेकर, राजू सावंत, उत्तम पाटील, तानाजी देसाई, भिकाजी हळदकर, युवराज पोवार, मेरी डिसोजा, माया शिंदे, विजेता मसूरेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील साई मंदीर व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोरील चौकात तात्पुरता रस्ता बंद केला होता. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शेकडो पोलिसांसह दोन दंगल प्रतिबंधक पथक तैनात केली होती. दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.