'चकाकणारे बेंटेक्स गेले अन् खरे सोने शिवसेनेतेच राहिले'

'सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे'
kolhapur political News
kolhapur political News
Updated on
Summary

'सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे'

कोल्हापूर - शिवसेना ही शिवसैनिकांचीच आहे, नुसते चकाकणारे बेंटेक्सचे होते, ते बंडखोरांबरोबर गेले, खरे सोने आजही शिवसेनेतच आहे, असा टोला खासदार संजय मंडलिक यांनी बंडखोर शिवसैनिकांना लगावला. यावेळी राजेश क्षीरसागर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर सर्वच पदाधिकाऱ्यांनी टीका केली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात मंडलिक बोलत होते. (kolhapur political News)

मेळाव्याला करवीर, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक एकत्र आले होते. त्यांना मार्गदर्शन करताना मंडलिक म्हणाले, ‘सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सच्चे शिवसैनिक पुन्हा सेनेची नव्याने बांधणी करतील. पुन्हा शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देतील.

kolhapur political News
दिलासादायक, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येत घट

जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकरांना उद्धव ठाकरे यांनी निधी दिला. त्यातून भुदरगड तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण झाली. बारवे-दिंडेवाडी या प्रकल्पाचे कामही याच निधीतून झाले. तरीही आबिटकरांनी बंड केले. मात्र, या प्रकल्पातील पाण्याचे पूजन आबिटकरांना करून देणार नाही. सामान्य शिवसैनिक हे पूजन करतील, आबिटकर बंड करून गेले असतील, पण ग्रामीण भागातील शिवसैनिक बाहेर जाणार नाही.' मेळाव्याला जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख सुनील मोदी, हर्षल सुर्वे, शुभांगी पोवार, मंजित माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार शिवसेना सोडणार नाहीत; मंडलिक

खासदार मंडलिक म्हणाले करवीर, कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघातील कार्यकारिणी बरखास्त करून ३० ऑगस्टपर्यंत नव्याने बांधणी केली जाईल. शिवसेनेचे खासदारही बंड करणार आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र, ही अफवा आहे. एकही खासदार बंडखोरांसोबत नाही. माझे ही नाव फुटणाऱ्यांच्या यादीत आहे; पण असे होणार नाही. खासदार शिवसेना सोडणार नाहीत.

kolhapur political News
गोवा काँग्रेसला वाचवण्यासाठी सोनिया गांधींनी संकटमोचक म्हणून महाराष्ट्राच्या नेत्याला पाठवलंय

क्षीरसागरांना चंद्रकांत पाटील जवळ करणार नाहीत

माजी नगरसेवक रविकिरण इंगवले म्हणाले, राज्यातील सरकार परिवर्तनात आपली भूमिका असल्याचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आहेत. पण ते सत्य नाही. आता ते चंद्रकांत पाटील यांना आपले नेते म्हणत आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी क्षीरसागर यांच्यावर पीएच.डी. केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील क्षीरसागरांना जवळ करणार नाहीत.

गुरुवारी भव्य मेळावा

जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचा भव्य मेळावा गुरुवारी (ता. १४) होणार आहे. या मेळाव्याला खासदार विनायक राऊत येणार आहेत. या मेळाव्यात जिल्ह्यातील शिवसेनेची पुढील भूमिका ठरवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.