धक्कादायक ः सांडव्यातून कळंबा तलाव होणार रिकामा, छत्तीस लाकडी बरगे चोरीस

 Shocking: Kalamba lake will be emptied from the drain
Shocking: Kalamba lake will be emptied from the drain
Updated on

कळंबा ः पावसाचा जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे कळंबा तलावाचा ओव्हर फ्लो कमी झाला आहे .मात्र लहान सांडव्याचे छत्तीस लाकडी बरगे चोरीला गेले आहेत. महापालिका प्रशासनाने वेळेत हे बरगे घातले नाहीतर तलावातील संपूर्ण जलसाठा या सांडव्या द्वारे वाहून वाया जाणार आहे. परिणामी शहरासह कळंबा गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 
यंदाच्या पावसाळ्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे कळंबा तलाव तुडुंब भरला आहे. तसेच तलावाची पाणी पातळी 27 फुटावर पोहोचली आहे. तलावातील सव्वातीन लाख घनमीटर गाळ बाजूला काढण्यात आला आहे. त्यामुळे तलावाच्या पात्राची खोली वाढली आहे. तसेच तलावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा तलावाला फटका बसला आहे. पावसाळ्यातील संपूर्ण जलसाठा तलावांमध्ये साठवून ठेवणाऱ्या लहान सांडव्याचे छत्तीस लाकडी बरगे चोरट्यांनी नेले आहेत. त्यामुळे तलावातून पाणीसाठा वाहून वाया जाऊ लागला आहे. 
कोल्हापूर महापालिकेने वेळेत या सांडव्याचे बरगे वेळेत बसवले नाही तर यंदाच्या पावसाळ्यात तलावात झालेला पाणी साठा या सांडव्याच्या याद्वारे वाहून वाया जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण कळंबा तलाव मोकळा होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात घट होऊ लागली आहे. तसेच मोठ्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग कमी होऊ लागला आहे. तलावातून शहरासह कळंबा गावाला दररोज पाच एम एल डी पाणी उपसा केला जात असून पुढील महिन्यापासून आणखी दोन एम एल डी पाणी उपसा वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे तलावामध्ये पाणीसाठा शिल्लक राहणे महत्त्वाचे असून महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या सांडव्याचे बरगे बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 


महापालिका प्रशासनाकडून कळंबा तलावाच्या लहान सांडवयामध्ये नवीन लाकडी बरगे बसवण्यात येणार आहेत. 
- उत्तम जाधव,जलशुद्धीकरण निरीक्षक

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.