Shravan 2023 : आज करवीर निवासिनी अंबाबाईच्या अंगावर सौभाग्यलंकार सोडला तर एकही दागिना नाही, जाणून घ्या कारण

...तर वर्षभर जगदंबेचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते
Shravan 2023
Shravan 2023esakal
Updated on

Shravan 2023 : अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी असते. नवरात्रौत्सव, दिवाळी, श्रावण, मार्गशिर्ष अशा अनेक सणांमध्ये देवीच्या दर्शनाला भाविक गर्दी करतात.

नुकतेच श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावणात महिलावर्ग पहाटेच देवीच्या दर्शनासाठी येतात. इतरवेळीही देवीची काकडआरती, दुपारी देवीची अलंकार पूजा पार पडते. त्यावेळी देवीचं ते देखणं रूप पाहण्यासारखंच असतं.

आज श्रावणातील दुसरा शुक्रवार आहे. त्यानिमित्ताने देवीची नित्य अंलकार पूजा करण्यात आली नाही. आज देवीला कोणताही दागिना न घालता तिची साधीच पूजा मांडण्यात आली आहे. आज देवीच्या अंगावर फक्त मणी मंगळसूत्र घातलं आहे. असं का ते आज आपण जाणून घेऊयात.

Shravan 2023
Ambabai Mandir Paid E-Pass : पेड दर्शन, व्हिआयपी पास बंद

आई अंबाबाईच्या दागिन्यांमध्ये पुतळ्याची माळ, साज, लफ्फा, कमरपट्टा, मुकूट, पाऊल, चंद्रहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशी, नथ, गदा यासह चांदीचे अलंकार व आभूषणे यांचा समावेश आहे. रोज या दागिन्यांनी देवीला सजवले जाते. पण, आज देवीच्या गळ्यात कोणत्यातरी पानांच्या, फुलांचा हार घातले आहे.

याचं कारण असं की, आज श्रावणातील दुसरा शुक्रवार आहे. आजच्या दिवशी प्रथेप्रमाणे वरदलक्ष्मी व्रत केले जात आहे. या व्रतादिवशी देवीची अशी साधी पूजा घालण्यात येते. (Shravan 2023)

Shravan 2023
Kolhapur Ambabai Temple : कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग, 'हा' नियम पाळावाच लागेल!

श्रावणात या व्रतादिवशी करवीरनिवासिनी जगदंबा अत्यंत साध्या आणि सुंदर रूपात असते. सौभाग्य अलंकार सोडला तर कोणतेही अलंकार देवीला घातले जात नाहीत. सूर्यास्तापूर्वी (प्रदोषकाली) श्री अंबाबाईची पूजा केली जाते.

या पूजेत देवीला बिल्वदले, तुळशी, दुर्वा अशा प्रत्येकी २१ पत्री घातल्या जातात. विविध सुमनांनी देवीची पूजा करतात. या पूजेलाच "पत्रीपुजा" असेही म्हणतात. या दिवशी उपवास केला जातो. (Kolhapur)

वरदलक्ष्मी व्रतातील देवीचे रूप
वरदलक्ष्मी व्रतातील देवीचे रूप esakal
Shravan 2023
Kolhapur Ambabai Darshan : अंबाबाईच्या दर्शनाला अडचणींची रांग

या पूजेचे महत्व असेही सांगितले जाते की जो कोणी आज जगदंबेचे दर्शन घेईल त्याला वरप्रदायिनी जगदंबा इच्छित वर देईल. अक्षता, पुष्प आदिंनी जगदंबेची पूजा व आरती केली जाते. ही पूजा प्रामुख्याने निसर्गाची जवळीक साधण्यासाठी केली जाते असे म्हटले तरी हरकत नाही.

कारण या पूजेच्याविधीत वापरली जाणारी पत्री ही विविध औषधी वनस्पती असतात. तेव्हा या वनस्पतींचे महत्त्व लोकांना कळावे यासाठीच हा प्रयत्न असावा. या दिवशी सुर्यास्तापुर्वी जगदंबेचे दर्शन घेतले तर वर्षभर जगदंबेचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते अशीही आख्यायिका सांगितली जाते."

Shravan 2023
Shravan 2023 : श्री. बाणेश्वर मंदिरात पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी निम्मित भक्तांच्या रांगा

वरदलक्ष्मी व्रताचे महत्त्व

वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. मात्र, सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. मात्र, तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये, यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात.

वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्‍यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे.श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.