CJI DY Chandrachud: न्यायाधीश साहेब वाचवा... कुत्र्यांबाबत कोल्हापुरकरांचे CJI चंद्रचूड यांना पत्र, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

CJI DY Chandrachud:  कोल्हापुरात कुत्रा चावल्याने रेबीजने एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोल्हापुरातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachudesakal
Updated on

CJI DY Chandrachud: कोल्हापुरात कुत्रा चावल्याने रेबीजने एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोल्हापुरातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांना श्वानदंशाच्या कायद्यात बदल करण्याबाबत पत्र लिहिले आहे. कोल्हापुरात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे लोक प्रचंड चिंतेत आहेत.

मोकाट कुत्र्याने (Stray Dog) चावा घेतल्याने उपचार घेत असलेल्या एका निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागला. श्रृष्टी सुनील शिंदे (वय २१, रा. विशाळगडकर कंपाउंडजवळ, नागाळा पार्क) असे तिचे नाव आहे. ती ग्राफिक डिझायनर होती.

कुत्रा चावलेल्यांच्या वतीने ॲनिमल काइंडनेस ॲक्ट रद्द करण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे.

कोल्हापूर शहरातही अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या आठवड्यात एका 21 वर्षीय ग्राफिक डिझायनरचा मृत्यू झाला. या प्रकरणी सर्वच वृत्तपत्रांमध्ये लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात आता महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणात लक्ष घालून काही ठोस पावले उचलण्याची विनंती केली आहे.

भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने वृद्धांच्या मृत्यूच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाल्याचे या पत्रात म्हटले आहे. सरकारी रुग्णालयातील उदासीनतेमुळे रुग्णांचा जीव जातो. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत कुत्र्यांच्या नसबंदीची यंत्रणा निष्क्रिय आहे. सरपंच, आमदार, खासदार, पालकमंत्री या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

CJI DY Chandrachud
शरद पवारांच्या मित्राच्या उमेदवारीलाच पक्षातून तीव्र विरोध; साताऱ्याच्या उमेदवारीवर पवारांची 'वेट ॲण्ड वॉच' भूमिका

शहरवासीयांमध्ये संतापाची लाट-

भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने रेबीज होऊन तरुणी मृत्युमुखी पडल्याने आज शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली. विविध पक्षांनी महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याबरोबरच प्रशासकांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी, बोंब मारत ठिय्या मारला. महापालिकेसमोर रास्ता रोकोही केला. प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबन तसेच फौजदारीची कारवाई करावी, अशा मागणीची निवेदनेही देण्यात आली. भटक्या कुत्र्यांबाबत तातडीने नियोजन करा अन्यथा अधिकाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ-

नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन नाही. भटक्या कुत्र्यांबाबत नियोजन झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शहरातील कुत्री सोडणार, असा इशारा कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आज महापालिका प्रशासनाला दिला. तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी दिले.

 २ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा -

शहरात वर्षभरात २ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. याच कारणामुळे एका युवतीचा बळी गेला. वारंवार निदर्शने, आंदोलने करूनही महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत गांभीर्याने धोरण ठरवत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केली. पक्ष कार्यकर्त्यांनी आज महापालिकेसमोर आंदोलन करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष-

शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्या हल्ल्यात श्रृष्टी शिंदे या २१ वर्षीय तरुणीचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. रेबीजचे इंजेक्शन घेऊनदेखील तिला या आजाराने गाठले. महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची जबाबदारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली होती. असे प्रकार वारंवार होऊन देखील अधिकारी या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. (Latest Marathi News)

CJI DY Chandrachud
Devdutt Padikkal Test Debut : शेवटच्या कसोटीत देवदत्त पडिक्कलचे पदार्पण! कर्णधार रोहितने संघात केले दोन मोठे बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.